फॅशन अधिक वाढल्याने माणसाचे आंतरिक समाधान हरवून गेले- ह.भ.प.गजानन महाराज जुनगडे
भोकर (तालुका प्रतिनिधी)आजकाल फॅशन जास्त वाढली असून बाह्य सुखाच्या भोवती आपण धावत आहोत त्यामुळे माणसाचे आंतरिक समाधान हरवून गेले आहे असे आध्यात्मिक विचार रामायण आचार्य ह.भ. प.गजानन महाराज जुनगडे यांनी सायाळ ता.भोकर येथे राम कथेत बोलताना मांडले
तालुक्यातील मौजे सायाळ येथे 23 फेब्रुवारी ते1 मार्च 2024 दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व रामकथेचे आयोजन करण्यात आले असून रामायणाचार्य ह .भ.प.गजानन महाराज जुनगडे यांच्या रसाळ वाणीतून राम कथा ऐकायला मिळत आहे.राम कथा ही माणसाच्या जीवनाची व्यथा दूर करते,जीवनात संसारात वागावं कसं हे राम कथेतून शिकायला मिळते,वडिलांचे प्रेम,भावाचं प्रेम,पत्नीचे प्रेम, आईची ममता,पतीचे प्रेम अशी अनेक पात्र रामायणात शिकण्यासारखे आहेत म्हणून आजच्या युवा पिढीने रामायणाचे अनुकरण करावे असे सांगून आपल्या मुलांना सुसंस्कारी बनवा त्यांना व्यसनापासून दूर ठेवा जीवनात दुःख आले तर निराश होऊ नका,रामचंद्र प्रभूंच्या जीवनात किती दुःख होते पण त्यांनी कधीच निराशा बाळगली नाही,प्रत्येक संकटांना ते सामोरे जात राहिले, संत श्रेष्ठ ज्ञानोबा रायाना सुद्धा त्रास झाला, आपले आयुष्य घड्याळाच्या काट्यासारखे आहे म्हणून प्रभुनामाचे चिंतन करा, प्रभू श्री रामचंद्रांचे मंदिर जीर्णोद्धार सोहळा होताना आपण सर्वांनी पाहिला असून आपण फार भाग्यशाली आहोत, पुढे येणारा काळ बिकट आहे हिंदू धर्माची जपणूक करणे गरजेचे आहे,गाईला महत्व द्या,हिंदू एकत्र राहिला नाही तर परप्रांतीय आक्रमण करतील,भगवा ध्वज त्यागाचं प्रतीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, भगवंताला प्रेमाने बोलवा तो नक्कीच तुमच्याकडे येईल,जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमधून तरुण जायचे असेल तर प्रभुनामाशिवाय दुसरे साधन नाही, लौकिक संपत्ती काही कामाची नाही, मनुष्य जन्म मिळाला आहे त्या संधीचं सोनं करा, आपण बाह्य सुखाच्या मागे लागल्यामुळे आपले आंतरिक सुखच हरवून गेले आहे म्हणून आंतरिक सुखासाठी भगवंतांचे चिंतन नामस्मरण भजन पूजन याशिवाय पर्याय नाही असेही शेवटी महाराज म्हणाले