भोकर मध्ये शाहू परिवाराच्या वतीने मान्यवरांचा कृतज्ञता सोहळा
भोकर( तालुका प्रतिनिधी)गेली 40 वर्षांपूर्वी कै.माजी आमदार बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांनी भोकर मध्ये रोवलेले शैक्षणिक रोपटे वटवृक्षांमध्ये रूपांतरित झाले असून या यशस्वी प्रवासामध्ये ज्यांचे योगदान लाभले अशा सर्व मान्यवरांचा कृतज्ञता सोहळा शाहू परिवाराच्या वतीने दि.16 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता.
भोकर येथे 1983 साली शाहू विद्यालयाची सुरुवात झाली शिक्षणाचा दर्जा शिक्षकांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनती मुळेच टिकून राहिला वाढत गेला,आज शाहू विद्यालय शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले नाव असून येथील अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत,आजही शाहू विद्यालयाची वाटचाल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या हेतूनेच चालू असून शैक्षणिक गुणवत्ता मात्र आजही चढत्या आलेखाने उंचावलेली आहे,दहावी,बारावीच्या परीक्षेत येथील विद्यार्थी हमखास चमकतात,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये शाहू विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला आहे या सर्व यशामध्ये माजी शिक्षक,पालक वर्ग,पत्रकार यांचाही महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे म्हणून 16 मार्च रोजी शाहू विद्यालयात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप वाघमारे हे होते प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक आबासाहेब देशमुख यांची उपस्थिती होती. दीप प्रज्वलनानंतर प्रमुख सर्व मान्यवरांचा शाहू परिवाराच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला प्रास्ताविकात बालाजी काळवणे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीबाबत माहिती दिली पालक प्रतिनिधी सोळंके पत्रकार एल.ए. हिरे, बी.आर.पांचाळ,विठ्ठल फुलारी, आबासाहेब देशमुख, शिक्षण अधिकारी एम.जी.वाघमारे, वजीराबादकर,वानखेडे, शिवानंद शिंदे आदींनी शाहू विद्यालयाच्या शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले शाळेची गुणवत्ता आणखी मोठ्या पद्धतीने वाढावी अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमास सुभाष पाटील गौड,मोहन पाटील,राजू लोकावाड,जकीयोदिन शेख,अनिल शिरसाट,डॉ.किरण पांचाळ,डॉ.राम नाईक आदिसह मान्यवरांची उपस्थिती होती सूत्रसंचालन राहुल जोंधळे यांनी केले तर आभार प्राचार्य संजय सावंत यांनी मानले