अजितदादाच्या विकासात्मक विचाराला पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा दादा सोबत काम करा :- राष्ट्रवादी ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष कल्यान आखाडे

भोकर ( प्रतिनिधी ) सामान्य माणसाला न्याय देणारा राष्ट्रवादी पक्ष आहे पक्षाच जाळ ग्रामीण भागात पसरवा कारण अजितदादा पवार हे खऱ्याअर्थी कार्यकर्त्यांचे नेते आहेत कार्यकर्त्यांना ताकद देणे त्यांची वैयक्तिक कौटुंबीक कामे करणे आणि प्रसंगी त्यासाठी सगळ्या यंत्रणा पूर्ण ताकदीने वाकवणे यात त्यांचा हातखंडा आहे. वीस- वीस वर्षे एखाद्या नेत्यांकडं काम करणाऱ्या रोज त्याच्या दारात उभ्या असलेल्या कार्यकर्त्याचंही काम त्या नेत्याकडून होत नाही एखाद्याच काम वर्षानुवर्षे न करणारे आणि त्यांना झुलवत ठेवणारे अनेक मंत्री मंत्रीमंडळात पाहिले आहेत मात्र दादानी ग्रामपंचायतीचाही सदस्य नसलेल्या छोट्या कार्यकर्त्याचं काम लक्षात ठेवून अजितदादा काम करतात महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक वर्षे सातत्याने फक्त आणि फक्त अजितदादा पवारच करत आहेत म्हणुन अजितदादाच्या विकासात्मक विचाराला पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा दादा सोबत काम करा असे आवाहन केले ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष बालाजी पाटील गौड यांच्या वतीने आयोजीत राष्ट्रवादी पक्ष भव्य प्रवेश सोहळ्या निमित व्यंकटेश टॉकी मैदान भोकर येथे कल्यान आखाडे यांनी केले
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज , संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प पुजन केले या वेळी बालाजी पाटील गौड ,कृष्णा भाऊ कटारे,विश्वांबर पवार,एकनाथ वाघमारे, ढाकणी वाले,भारत काकडे,गोविंद ,तेजंदर सिंग,तुकाराम माधावाड,संदीप राऊत,आनंदराव टिपरसे,आनंद डांगे,राजेश्वर कदम,नामदेव वाघमारे,आदि च्या उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला या प्रसंगी शहरासह तालुक्यातील धारजणी, रेणापुर,रायखोड,धानोरा येथील असख्य कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीत प्रवेश केला सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार महेद्र कांबळे यांनी केले आहे या कार्यक्रमास असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Google Ad