श्रीराम नवमी व महारूद्र यात्रा निमित्त टाकळगाव येथे कराटे प्रात्याक्षिक संपन्न

वसमत तालुक्यातील टाकळगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने श्रीरामनवमी व महारूद्र यात्रा समितीच्या वतीने कुस्ती स्पर्धा व कराटे प्रात्याक्षिकांचे आयोजन केले होते .
मारोती शिंदे महाराष्ट्र पोलिस , पंकज पापलवाड यांनी व त्यांच्या गावातील टिम ने पुढाकार घेऊण विदयार्थात खेळाची आवड निर्माण होऊण खेळाडू चा विकास व्हावा या हेतुने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रंसगी तिरूमला तिरूपती मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी चे डायरेक्टर श्री शांताराम घाडी मुंबई, युनीट व्यवस्थापक श्री जितेश मोहीते, श्री रमेश काटके ,मा.संचालक कृ.उ.बा.समीती, क्रीडा मार्गदर्शक संतोष नांगरे ,श्री मनोज पतंगे योगाचार्य धाराशीव, कोच शेख मोईन , प्रविण कांबळे, रामभाऊ टाकणखार , हर्षद खरे , सृष्टी पांचाळ , संबोधी गायकवाड अदि मान्यवर उपस्थीत होते.
हिंगोली जिल्हा स्पोर्टस् कराटे डो असोशिएशन च्या खेळाडुंनी जिल्हा सचिव संतोष नांगरे यांच्या मार्गदर्शना खाली चित्तथरारक प्रात्याक्षिक सादर करूण उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवीला. कु. श्रध्दा बाबाराव नवघरे 14 वर्षीय मुलीच्या पोटावरून मोटार सायकल चालवुन दाद मिळवीली तसेच कुस्ती स्पर्धेत ही सहभाग नोंदवीला.

Google Ad