पो.स्टे. वसमत ग्रामीनच्या हददीत ०१ गावठी पिस्टल व ०४ जिवंत काडतुस जप्त
मा. पोलीस अधीक्षक हिंगोली . जी. श्रीधर यांनी जिल्हयात चोरी, घरफोडी, दरोडा ड गुन्हे घडु नये त्यावर नियंत्रण असावे म्हणुन सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नियमित तपासणी सोबतच सतर्क रात्रगस्त व पेट्रोलींग इ. बाबत हिंगोली पोलीसांकडून नियमित कार्यवाही केली जात आहे.
दिनांक-२४/०४/२०१४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे पोनि . विकास पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, मौजे कनेरगाव येथील इसम नामे दत्ता गंगाधर सुर्यवंशी वय २५ वर्ष याचे कडे गावठी बनावटीचे पिस्टल व काडतुस आहेत अशी माहीती मिळाल्यावरून सदरची माहिती पोलीस अधीक्षक . जी. श्रीधर यांना देवुन पोलीस स्टेशन वसमत ग्रामीनचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे सदर इसमास ताब्यात घेवन गावठी पिस्टल जज करण्याच्या सुचना देण्यात आल्या त्यावरून सपोनि काचमांडक व त्यांचे पथक असे मिळुण गावठी पिस्टल बाळगणारा इसम नामे दत्ता गंगाधर सुर्यवंशी वय २५ वर्ष यास ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचे जवळील गावठी बनावटीचे पिस्टल सह ०४ जिवंत काडतुस काढुन दिले त्यावरून पोस्टे वसमत ग्रामीन येथे सदर इसमा विरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक हिंगोली . जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभगीय पोलीस अधिकारी मारोती थोरात यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलीस निरीक्षक विकास पाटील, सपोनि काचमांडे, पोलीस अंमलदार अविनाश राठोड, नामदेव बेंगाळ यांनी केली.