भोकर मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी


भोकर( तालुका प्रतिनिधी)गावाच्या स्वच्छतेचा मंत्र देणारे ग्रामगीता ग्रंथा मधून आदर्श गावाची संकल्पना मांडणारे खंजिरी भजनामधून राष्ट्रभक्ती जागवणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 115 वी जयंती भोकर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समिती आश्रमात साजरी करण्यात आली
30 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली,त्यानंतर समितीचे सचिव बी.आर.पांचाळ यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपला देह समाजसेवेसाठी झिजविला,त्यांनी ग्राम सुधारण्याचा महामंत्र दिला,व्यसनमुक्ती जातीयता निर्मूलन,युवा जनजागृती,राष्ट्रभक्ती अशा विषयांमधून समाज जागृती केली असे त्यांनी सांगितले आरतीनंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला लहान बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी समितीचे अध्यक्ष बापुराव पाटील सोनारीकर ,संचालक प्रकाश मामा कोंडलवार ,शंकरराव देवठाणकर,व्यंकटेश मारकवार,अवधूत राजुरे,विकास कांडलीकर,वाघमारे ,वट्टमवार सावकार यांच्यासह बालक बालिका उपस्थित होत्या

Google Ad