मा.पोलीस अधीक्षक हिंगोली यांचे मार्गदर्शनात एकाच वेळेस संपुर्ण जिल्हयात विशेष कोम्बींग (ऑलआउट) ऑपरेशनची कार्यवाही

त्याचाच भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी, अवैध धंदे विरुध्द कार्यवाही, फरार व पाहीजे तसेच न्यायालयाचे वारंट मधील आरोपी शोध अशा व्यापक हेतुने मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनात दिनांक ०४/०५/२०२४ चे रात्री २३.०० पासुन दिनांक ०५/०५/२०२४ थे सकाळी ०५.०० वा. पावेतो संपुर्ण जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कॉम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. सदर मोहीमेत मा.अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी . मारोती थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी श नितीन काशीकर, पोलीस निरीक्षक स्थागुशा . विकास पाटील, पो.नि.. नरेंद्र पाडळकर, पो.नि.. कुंदनकुमार वाघमारे, पो.नि.. गणेश राष्हारे, पो.नि. मोहन भोसले, पो.नि. विष्णुकांत गुट्टे पो.नि. तांबे, सपोनि अनिल कानमांडे, सपोनि, गजानन बोराटे, सपोनि सुनिल गोपीनवार, सपोनि विलास चवळी, सपोनि राम निरदोडे, सपोनि रामोड सपोनि रवि हुंडेकर, सपोनि अरूण नागरे, तसेच स्थागुशा चे सपोनि राजेश मलपिलु, सपोनि शिवसांब घेवारे व सर्वच पोलीस स्टेशन मधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.

सदर मोहीमेत जिल्हयातील एकुण ४० विकाणी जेथे रेकॉर्ड वरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली. तसेच जिल्हयातील मोक्का मधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहीजे असलेले आरोपीचीही तपासणी करून, सदर मोहीमेमध्ये मा. न्यायालयाकडुन वेळोवेळी समन्ना निघुनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांचे बाबत मा. न्यायालयाकडुन अटक वॉरंट निघाले होते अशा इसमाविरुद एकुण ०४ अटक वॉरंट व ०५ जमानती वॉरंटची बजावणी करण्यात आली. जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत महत्त्वाचे ठिकांणी नाकाबंदी करण्यात येवुन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. तर अंधाराचा फायदा घेवुन बोरीचे करण्याचे उददेशाने संशयास्पदरित्या मिळुन आलेल्या इसमाविरूध्द पोलीस स्टेशन हिंगोली शहर, कळमनुरी, वसमत शहर, कुरूंदा, औंढा ना., हटटा असे मिळून एकुण ०९ इसमांविरूध्द कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा, एकुण ०२ इसमाविरूष्द कलम १४२ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध चंद्या विरोधात सुध्दा कार्यवाही करण्यात आली.

Google Ad