झाडे लावण्यापेक्षा संस्थांनी त्यांची जोपासना करावी-उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांचे आवाहन
सावली प्रतिष्ठान करणार गावा गावात” वृक्ष जगवा” मोहीम
भोकर दि.20/05/2024 (तालुका प्रतिनिधी)झाडे लावणे महत्त्वाचे काम आहेच मात्र त्यापेक्षा झाडांची जोपासना करणे अत्यंत महत्त्वाचे काम आहे ते संस्थानी करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी सावली प्रतिष्ठानच्या बैठकीत बोलताना केले.
भोकर तालुक्यात येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येक गावात ग्रामपंचायत,शाळा व रिकाम्या जागेत भोकर शहरात रस्त्याच्या कडेने,महत्त्वाच्या ठिकाणी सावली प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवड मोहिम हाती घेण्यात येणार असून वनपरिक्षेत्र कार्यालय,पंचायत समिती,गटशिक्षणाधिकारी कार्यालय,नगरपरिषद भोकर यांच्या सहकार्यातून हे काम करावयाचे आहे, त्या संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर येथे 21 मे 2024 रोजी आढावा बैठक बोलाविण्यात आली होती,उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार सुरेश घोळवे यांनी वृक्षारोपण मोहिमे संदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या,हरित गावे,हरित टेकड्या बनवण्याचे आवाहन केले,यावेळी गटविकास अधिकारी माधव केंद्रे,वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवान,गटशिक्षण अधिकारी माधव वाघमारे,नगर परिषद कर्मचारी जावेद इनामदार,सुनील कल्याणकर,सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी.आर. पांचाळ,कार्याध्यक्ष डॉ.विजयकुमार दंडे,कोषाध्यक्ष सुरेश बिल्लेवाड ,सौ.विजयाताई घिसेवाड,डॉ.सौ.श्रद्धा बेलगमवार,राजेश एकाळे,महेश नारलावार,दया गुंडेराव, चेतन कोटूरवार आदींची उपस्थिती होती.