सावली प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक गावात 100 झाडे लावण्याचा संकल्प :”वृक्ष जगवा” मोहीम राबविणार
भोकर( तालुका प्रतिनिधी )वृक्षारोपणाचे काम करण्याबरोबरच ती जगली पाहिजे यासाठी प्रयत्न करणाऱ्या सावली प्रतिष्ठानने चालू वर्षी प्रत्येक गावात 100 झाडे लावण्याचा व भोकर शहरात देखील हरित भोकर करण्याचा संकल्प केला असून वृक्ष जगवा मोहिम हाती घेणार आहेत ग्रामीण भागातील व शहरातील नागरिकांनी यासाठी योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.जंगलातील वृक्ष नष्ट होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे,तीव्र उन्हाळा जाणवतो,पाणी टंचाई भीषण जाणवते,पाऊस वेळेवर पडत नाही,पडलेले पाणी जमिनीत जिरवल्या जात नाही अशा विविध समस्यावर मार्ग काढण्यासाठी व मानवी जीवन चांगले जगण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याची जोपासना करावी हा संकल्प घेऊन गेली 5 वर्षापासून सावली प्रतिष्ठान काम करीत आहे,केवळ झाडे लावण्याचेच काम नाही तर झाडे लावून ती जगवण्यासाठी जाळ्या लावणे,पाणी टाकने हा उपक्रम हाती घेणार आहे,शहरात अनेक शाळांमध्ये रिकाम्या जागेत,ग्रामीण भागात,वृक्षारोपण केलेली झाडे आज मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसत आहेत चालू वर्षी देखील प्रत्येक गावात कमीत कमी 100 झाडे लावण्याचा संकल्प सावली प्रतिष्ठानने केला असून उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी,तहसीलदार सुरेश घोळवे,भोकर नगर परिषदेचे मुख्यधिकारी मारुती जगताप,गटविकास अधिकारी माधव केंद्रे,वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवान,गटशिक्षण अधिकारी माधव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली असून सावली प्रतिष्ठान या कामी पुढाकार घेणार आहे, चालू वर्षाच्या पावसाळ्यात गावा गावातून वृक्ष दिंडी काढून शाळेतील विद्यार्थ्यांची जनजागृती करण्यात येईल,ग्रामपंचायत 25,शाळा 25,अंगणवाडी 10,आशा वर्कर 10,स्वस्त धान्य दुकानदार 15,तंटामुक्ती अध्यक्ष 10,सामाजिक संस्था 10,निवृत्त कर्मचारी 10,वृक्षप्रेमी मंडळ 10, महिला बचत गट प्रत्येकी 10 ,पोलीस पाटील 10 अशा पद्धतीने सर्वांचा सहभाग घेऊन वृक्ष जगवा मोहिम राबवायची आहे लावलेल्या झाडांची जोपासना देखील करावयाची आहे, भोकर शहरातील महत्त्वाच्या शाळा,महाविद्यालय,रिकामी जागा,शासकीय कार्यालय अशा ठिकाणी वृक्षारोपण करून हरित भोकर करण्यात येणार आहे नागरिकांनी वृक्षप्रेमी मंडळींनी या कामे सहकार्य करावे असे आवाहन सावली प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे