हट्टा पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा डाव उधळला
मागील काही दिवसात एटीएम चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून एटीएम , बँक व सोने चांदीचे दुकान सुरक्षा बाबत हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सर्व ठाणेदारांना चोरीच्या घटनांना आळा घालण्याबाबत उपाययोजना संदर्भाने संदेश दिला होता.
तसेच अनेक प्रसार माध्यमाद्वारे सुद्धा हिंगोली जिल्ह्याच्या आजूबाजूला एटीएम चोरीचे घटना घडत असल्याबाबत व बँक अधिकारी तसेच सोनार दुकानदार यांनी चोरीच्या घटनांना आळा घालण्याबाबत काय उपाययोजना करावी याबाबत बातमी दिली होती.
त्या अनुषंगाने दिनांक 23/ 5 /2024 रोजी मध्यरात्री सपोनि गजानन बोराटे यांच्या नियंत्रणात पोलीस अमलदार प्रीतम चव्हाण व शेख मदार हे मोटार सायकलवर जवळा बाजार परिसरात पेट्रोलिंग करीत असताना रात्री 01.15 वा वाजण्याचे सुमारास जवळा बाजार बस स्थानकालगत एसबीआय बँकेच्या एटीएम जवळ एक AP- 23 पासिंग चे संशयित बोलेरो पिकप उभे असल्याचे व त्यामध्ये चार-पाच लोक असल्याचे दिसले , त्या अनुषंगाने पोलिसांना सदर पिकप बाबत चौकशी करण्यासाठी जवळ जात असतानाच सदर बोलेरो पिकप अति वेगाने नागेश वाडीकडे निघून गेले, पोलीस अंमलदारांनी त्याचा पाठलाग केला परंतु संशयीत बोलेरो पिकप अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
सदर पुणे पेट्रोलिंग करून एटीएम चोरीचा डाव उधळून लावल्याबद्दल हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर यांनी हट्टा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनी श्री गजानन बोराटे, पोलिसा अमलदार प्रीतम चव्हाण, शेख मदार यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस दिले आहे. होती.
त्या अनुषंगाने दिनांक 23/ 5 /2024 रोजी मध्यरात्री सपोनि गजानन बोराटे यांच्या नियंत्रणात पोलीस अमलदार प्रीतम चव्हाण व शेख मदार हे मोटार सायकलवर जवळा बाजार परिसरात पेट्रोलिंग करीत असताना रात्री 01.15 वा वाजण्याचे सुमारास जवळा बाजार बस स्थानकालगत एसबीआय बँकेच्या एटीएम जवळ एक AP- 23 पासिंग चे संशयित बोलेरो पिकप उभे असल्याचे व त्यामध्ये चार-पाच लोक असल्याचे दिसले , त्या अनुषंगाने पोलिसांना सदर पिकप बाबत चौकशी करण्यासाठी जवळ जात असतानाच सदर बोलेरो पिकप अति वेगाने नागेश वाडीकडे निघून गेले, पोलीस अंमलदारांनी त्याचा पाठलाग केला परंतु संशयीत बोलेरो पिकप अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
सदर पुणे पेट्रोलिंग करून एटीएम चोरीचा डाव उधळून लावल्याबद्दल हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हट्टा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनी गजानन बोराटे, पोलिसा अमलदार प्रीतम चव्हाण, शेख मदार यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस दिले आहे.