हिमायतनगर तालुक्यातील एका पत्रकारास मारहाण केल्याप्रकरणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे निवेदनाद्वारे निषेध…
हिमायतनगर तालुक्यातील एका पत्रकारास मारहाण केल्याप्रकरणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे निवेदनाद्वारे निषेध…
हिमायतनगर तालुक्यातील पत्रकार बंधू आपापल्या परीने लेखणीच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध तथा धंद्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत असतात. अशाच प्रकारच्या अवैध धंद्या विरुद्ध आवाज उठवणारे पत्रकार धम्मपाल मुनेश्वर रा. सिरंजनी तालुका हिमायतनगर हे दि.16/042024 रोजीच्या दैनंदिन वृत्त संकलन व आपल्या फोटो स्टुडिओ चे दुकान बंद करून गावाकडे अंदाजे 10 वाजता जात असताना,रस्त्या मध्ये अडवून जबर मारहाण करून जखमी केले आहे. याबाबत पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु सदरील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही आहे. तरी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा हिमायतनगर पत्रकार संघटनेच्या वतीने लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असे सर्व पत्रकार संघटनेद्वारे सांगण्यात आले आहे.
यावेळी अखिल भारतीय पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुद्धोधन हनवते,जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार नागोराव शिंदे,ज्येष्ठ पत्रकार बनसोडे, जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर पंदीलवाड, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे हिमायतनगर ता अध्यक्ष देवानंद गुंडेकर,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत राहुलवाड, ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक गंगाधर गायकवाड, पत्रकार मनोज पाटील, पत्रकार एस.पी. गुंडेकर पत्रकार विजय वाठोरे,पत्रकार विशाल हनवते, पत्रकार राम चिंतलवाड पत्रकार शेख मनांन, पत्रकार बाबाराव जरगेवाड,जेष्ठ पत्रकार असद मौलाना सह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते.