भोकर (प्रतिनिधी) दिस मावळतीच्या वाटेवर असतांना क्षितीजावरील शांत,शितल, रंगसंगतीच्या छटा..सैरभैर झालेल्या मनाला शांतीचा संदेश देत होती..सांजवेळी पक्षांचे थवे विसावा घेण्यासाठी घरट्याकडे झेपावत होते.अशा अल्हाददायक वातावरणात बूध्दसंध्येतील एकापेक्षा एक सरस भीमबूध्द गीतांच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाखी पोर्णिमेला लूबींनी येथे झाला.त्यामुळे पोर्णिमेला धम्मात अनन्य साधारण महत्व आहे.याच निमित्ताने शहरातील शाहिद प्रफुल्ल नगर,समतानगर,महात्मा फुले नगर,आंबेडकर चौक येथे बूध्दजयंतीच्या निमित्ताने पंचशील ध्वजवंदन करून तथागत भगवान गौतम बुद्धांस अभिवादन करण्यात आले.दुस-या सत्रात सायंकाळी सहा वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून पणतीज्योत मिरवणूक काढण्यात आली,लूबिंनी बूध्दविहार येथे महात्मा फुले नगर मीत्र मंडळाच्या वतीने खीर व भोजन दान करण्यात आले.त्या नंतर तिसऱ्या सत्रात “बूध्दसंध्या ” हा भीमबूध्द गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सुर्य मावळतीच्या दिशेनी झेपावला असता क्षितीजावर विविधरंगी छटानी व्यापून गेले.सांजवेळी पक्षी आपल्या घरट्यात विसावले.वैशाख पौर्णिमेच्या शितल प्रकाशात गूरूवारी ( ता. २३) बूध्दजयंतीच्या निमित्ताने बाबुराव पाटील प्रस्तुत”बूध्दसंध्या ” हा भीमबूध्द गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला.प्रारंभी अनूष्का सोनकांबळे,रिया मोरे या बालीकेनी अप्रतिम नृत्य सादर केली.बुध्दसंध्येच पहिले पुष्प विनोदांचा बादशहा तथा गायक सिध्दार्थ खिल्लारे यांनी आपल्या पहाडी आवाजात”तूझ प्रथम हे नमन गौतम” या गीतांनी आरंभ केला. त्या नंतर विनोदी शैलीनी रसिकांस खिळवून ठेवले.गायक जसपाल सोनकांबळे यांनी कुंभारापरी तु भीमा समाजाला घडवीले,काळजावर कोरले नाव आमच्या भीमा कोरेगाव असे एकापेक्षा एक सरस गीत सादर केले.जुन्यापीढितील ख्यातनाम गायीला हरबंस कौर यांनी बुध्द देवा तुझी ज्ञान गंगा,माझ्या भिमाच्या नावाच, माझ्या सांभाळ लाडक्या जीवीच्या जीवा अशा गीतांचा नजराणा सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी संगीत साथ बाबुराव पाटील (तबला), प्रवचन लोखंडे (कीबोर्ड),अनील जमदाडे (पॅड), अमोल रावळे( अत्याधुनिक सांऊड आपरेटर) यांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कपील कांबळे, विक्रम क्षिरसागर, साहेबराव मोरे,मनोज शिंदे,दलीत डोंगरे, जयभीम पाटील ,अविनाश गायकवाड,लक्ष्मीकांत कांबळे,प्रर्वचन लोखंडे,प्रितम डोंगरे ,मिलिंद दूधारे,संतोष डोंगरे,सुनील दूधारे, राहुल जाधव ,वैभव कोकाटे, केरबा जाधव ,बिबींसार पाटील,रोहन मोरे,तूषार धुतुरे चंद्रमुनी गूळवे यांनी परिश्रम घेतले.