” मासिक पाळी स्वच्छता दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा
भोकर :- केंद्र शासन यांचे पत्र व महाराष्ट्र शासन सार्वजानिक आरोग्य विभाग अंतर्गत मा.डॉ नितिन अंबाडेकर साहेब, अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय शिक्षण पुणे यांनी सुचित केल्यानुसार मा. डॉ निळकंठ भोसीकर साहेब जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ बालाजी शिंदे साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांच्या सुचनेनुसार व मा. डॉ प्रताप चव्हाण सर वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार आज दि २८ मे २०२४ रोजी ” मासिक पाळी स्वच्छता दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा करण्यात आला.
महिलांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि सन्मानासाठी मासिक पाळी स्वच्छता महत्त्वाची आहे. दुर्दैवाने, सामाजिक निषिद्ध आणि योग्य मासिक पाळी स्वच्छता ज्ञानाच्या अभावामुळे, अनेक महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात आव्हानांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. मासिक पाळीच्या आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापनाच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी ” मासिक पाळी स्वच्छता दिवस ” साजरा करण्यात येतो. या वर्षीचे जागतिक घोष वाक्य ” Together for a Period Friendly World ” या घोष वाक्यासह साजरा करण्यात आला.
वैद्यकिय अधिकारी डॉ. शिल्पा कळसकर, डॉ. अनंत चव्हाण, अधिपरीचारीका राजश्री ब्राम्हने यांनी मासिक पाळी मध्ये घ्यावयाची काळजी, मासिक पाळीचे समज- गैरसमज व स्वच्छते बदल मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक आरकेएसके समुपदेशक सुरेश डूम्मलवाड यांनी केले.
यावेळी दंत शल्य चिकित्सक डॉ माया नरवाडे, वैद्यकिय अधिकारी डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अविनाश गुंडाळे, डॉ मुदशीर, डॉ ज्योती यन्नावार, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी रोहिणी भटकर, जागृती जोगदंड, अधिपरीचारीका जीजा भवरे, आरोग्य सेविका स्वाती सुवर्णकार, कॉन्सलर रेणूका भिसे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अत्रिनंदन पांचाळ, मनोज पांचाळ,औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, मल्हार मोरे, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे, शिंदे मामा आदि अधिकारी, महिला कर्मचारी, महिला नागरिक उपस्थीत होते.