छ.शिवाजी महाराज हे जसे पुरुषामधले उत्तम राजे होते तशा अहिल्यादेवी स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होत्या – राजे भुषनसिंह महाराज होळकर
भोकर/सुभाष नाईक
आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवीने रयतेचे मन जिंकले, त्यांच्या काळात प्रजा सुखी होती.अशा दानशुर,कृतत्वान,धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्यादेवी होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे जसे पुरुषामधले उत्तम राजे होते तशा अहिल्यादेवी होळकर स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होत्या असे मत श्रीमंत राजे भुषनसिंह महाराज होळकर यांनी व्यक्त केले.ते भोकर येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती व्याख्यान कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलत होते.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने दि. २ जुन रोजी दुपारी २ वा.व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या भव्य अशा कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती नागनाथजी घिसेवाड हे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंदोरचे नरेश राजे भुषनसिंह महाराज होळकर,विषेश प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अतिरिक्त महसूल आयुक्त समीर वानखेडे, प्रमुख आकर्षक मराठी चित्रपट अभिनेत्री क्रांती रेडेकर, ईतिहासकार सतीष सातोनकर,विचारवंत प्रा.यशपाल भिंगे, बालाजी गाढे, गोविंद पाटील,उल्हास नाईक, सुचिता नाईक, प्रकाश नाईक,दिपक बागुल, पंढरीनाथ ढाले पाटील,प्रा.साईकिरण सलगरे यांची उपस्थिती होती.यावेळी प्र प्रथम अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवराचा सत्कार घोंगडी काठी देऊन करण्यात आला तर आयुक्त समीर वानखेडे यांना स्मृती सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. राजे भूषण सिंह महाराज होळकर व अभिनेत्री क्रांती रेडेकर यांना स्मृतीचिन्ह देऊन जयंती मंडळाच्या वतीने गौरविण्यात आला. यापूर्वी कार्यक्रमाच्या अगोदर सकाळी ११ वाजता समाज प्रबोधनकार ऋषिकेश महाराज रेळे यांचे राष्ट्रीय कीर्तन झाले.
यावेळी राजे भूषण सिंह म्हणाली की अहिल्यादेवींनी आपल्या काळात अनेक मंदिराचे जीर्णोद्वार केले लाखो बारा खोदल्या धर्मशाळा बांधकाम असे काम अहिल्यादेवी ने केले महिलांचा उद्धार करणाऱ्या एकमेव प्रजा राज्य करती म्हणून त्या होत्या त्यांचा आदर्श ठेवून लोकांनी कार्य करावे असे प्रतिपादन त्यांनी केले.
देश सेवेसाठी यूपीएससी परीक्षेत विद्यार्थ्यांनी उतरावे- समीर वानखेडे
देशसेवा करताना मनात भीती न बाळगता कार्य करावे यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्य अभ्यास करत यूपीएससी परीक्षेत उतरावे देशात ड्रस माफियाचे जाळे एवढे पसरले की ते कोणी थांबू शकत नाही कारण याला अनेकांचा मोठा पाठिंबा आहे अशामुळे ते सेवेसाठी एमपीएससी परीक्षेची तयारी करा मी यासाठी सहकार्य करीन असे प्रतिपादन आयुक्त समीर वानखेडे यांनी यावेळी व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमात प्रमुख आकर्षक असलेल्या अभिनेत्री क्रांती रेडेकर इतिहासकार सतीश सातवणकर प्राध्यापक यशपाल भिंगे बालाजी गाडे यांनी विचार मांडले या कार्यक्रमाचे प्रस्ताव जेष्ठ समाज नेते नागोराव शेंडगे बापू यांनी केले तर सूत्रसंचालन बालाजी वरवडे यांनी केले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष नाईक किनीकर, गजानन पानेवार, राज हाके, सुशील शिंदे, निकेश सूर्यवंशी, संजय देवकत्ते, उत्तम कसबे, शंकर डांगरे, बळीराम माने, खंडू गोरे, सतीश माने, निलेश चिकाळकर, माधव सलगरे, नामदेव तरंगे, विलास पानेवार, गणेश कवळासे, देवबा शिळेकर गणेश आरलवाड आदीनी केले.