जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नारवाट पर्यटन स्थळ येथे वृक्षारोपण: सावली प्रतिष्ठान करणार गावोगावी वृक्ष लागवड
भोकर( तालुका प्रतिनिधी)जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून 2024 रोजी भोकर पासून जवळच असलेल्या नारवाट येथील वन विभागाच्या पर्यटन स्थळावर वृक्ष रोपण करण्यात आले,सावली प्रतिष्ठानने या कामी सहभाग घेतला असून तालुक्यात येणाऱ्या पावसाळ्यात गावोगावी वृक्ष लागवड करून वृक्ष जगवा मोहीम हाती घेणार असल्याचे सांगितले.
5जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून पर्यावरणाची काळजी घेण्याच्या आपल्या सामूहिक कर्तव्याची एक सशक्त आठवण म्हणून हा दिन साजरा केला जातो संसाधनांचे रक्षण करून पर्यावरण पूरक उपायासाठी झाडे लावणे,समुद्र किनारे,नद्या,स्वच्छ करणे सभा आयोजित करून पर्यावरणाची जागृती करणे,पर्यावरण हे वातावरण,हवामान,स्वच्छता,प्रदूषण आणि झाडापासून बनले आहे पर्यावरणाचा आपल्या जीवनाशी थेट संबंध आहे मनुष्य आणि पर्यावरण एकमेकावर अवलंबून आहे,झाडांची जोपासना करणे,प्रदूषण रोखणे,स्वच्छता राखणे या सर्व गोष्टी पर्यावरणाला प्रभावित करतात हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून भोकर वनपरिक्षेत्र कार्यालय व सावली प्रतिष्ठानच्या वतीने नारवाट पर्यटन स्थळ येथे वृक्षारोपण करण्यात आले वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवान यांनी पर्यावरण दिनाबाबत माहिती दिली,सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी.आर.पांचाळ यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करून” वृक्ष जगवा” मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमास बालविकास प्रकल्प अधिकारी पी.एस.चटलावार,सावली प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाबुराव पाटील,सौ.विजयाताई घीसेवाड,रमेश घुमनवाड,महेश नारलावार,वनपाल ज्ञानेश्वर धोंडगे,संभाजी घोरबांड,वनरक्षक सुभाष पिलाजी,बजरंग देवकते,मिनाज पठाण,निर्जला भातमोडे,तुकाराम किसवे, यांच्यासह कर्मचारी कामगार व नागरिक उपस्थित होते