भोकर मध्ये ओबीसी आरक्षण बचावासाठी चितेवर बसून आमरण उपोषण सुरू: ओबीसी बांधवांनी दिला पाठिंबा
भोकर( तालुका प्रतिनिधी)मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये,सगे सोयरे संदर्भात ओबीसी आरक्षणात जी.आर काढू नये यासाठी भोकर मध्ये 20 जून 2024 पासून तहसील कार्यालयासमोर संजय दिगंबर गौड आलेवार रा.भोकर यांनी चितेवर बसून आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनास सकल ओबीसी बांधवांनी पाठिंबा दर्शविला आहे.
तहसीलदार भोकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला सगे सोयरे या सबबी खाली आणि एकूणच ओबीसी आरक्षणातून जीआर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हालचाली चालू केल्या असून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यास ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाचा हक्क हिरावल्या जाईल त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणात सगेसोयरे च्या नावाखाली घुसखोरी नको यासाठी लोकशाही मार्गाने आपण भोकर तहसील कार्यालयासमोर चितेवर सरणावर बसून आमरण उपोषण करणार असे निवेदन दिले होते त्यानुसार 20 जून रोजी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून लाकडाची चिता रचून सरणावर आमरण उपोषण सुरू केले आहे, शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी ओबीसी नेते रामेश्वर बाबा गौड, नागोरावजी शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत शासनाची चुकीचे भूमिका दिसत असून ओबीसींचा खरा हक्क हिरावल्या जात आहे त्यासाठी ओबीसी समाज आता मागे हटणार नाही हक्क हिरावल्या जात आहे मोर्चे आंदोलने तीव्र करावे लागतील असे मत मांडून सर्व ओबीसी बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले यावेळी ओबीसी नेते नागनाथ घीसेवाड, माधवराव अमृतवाड, सुभाष नाईक, एल.ए .हिरे,गोविंद गिरी, अनंतवाड गुरुजी,साईनाथ याटेवाड साहेबराव भोंम्बे रमेश महागावकर,पांडुरंग वर्षवार,निळकंठ वर्षेवार,दत्ता बोईनवाड ,प्रकाश बोंदिरवाड ,रवी गेंटेवार यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते