कुरूंदा पोलीसांची अवैध हातभट्टी दारू कारखाण्यावर धाड

वसमत तालुक्यातील कुरूंदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बहीरोबा चोंढी येथे मानवी आरोग्यास हानीकारक ,मानवी जिवीतास धोका होईल असे विषारी द्रव्य बनविणाऱ्या इसमाच्या घरावर धाड टाकुण कार्यवाही करण्यात आली. पोलीस नाईक श्री गजानन भालेराव 853 यांच्या फिर्यादी प्रमाणे आरोपी रूस्तूम सिताराम चव्हाण याच्या घरासमोरील झोपड्यात निळया रंगाच्या ड्रम, टाकी मधे हातभट्टी तयार करण्याचे रसायन ,पांढ्ऱ्या रंगाच्या प्लास्टीक मधे विषारी युरीया खत , 7 बिस्लरी बॉटल मधे हातभट्टी दारू असा 8180/- रू मुद्देमाल स्वःताच्या फायदया साठी अवैधरित्या विकताना आढळून आला.
पोलीस निरक्षक श्री ——– यांच्या मार्गदर्शना खाली कलम 328 भादवी सह कलम 65 (ख)(ड) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा प्रमाणे पो.हे.513 श्री राठोड यांनी गुन्हादाखल केला तर पोहे.110 श्री देवकर पुढील तपास करत आहेत .