भोकर शहरा जवळील शेतीचा रस्ता झाला मोकळा

भोकर( तालुका प्रतिनिधी)शहरातील गट क्रमांक 256 मधील शेतीसाठी जाणारा रस्ता तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या मार्गदर्शनानुसार दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या संमतीने मोकळा करण्यात आल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केल्या जात आहे. गेली अनेक वर्षापासून सदर रस्ता नकाशावर असून देखील शेतीला जाण्या येण्यासाठी मोकळा नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत होती शेजारी शेतकऱ्याची संमती घेऊन स्थळ पाहणी करून चौकशी करून 14 डिसेंबर 2023 नुसार रस्ता मंजूर करण्यात आला होता त्या बाबतची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार सुरेश घोळवे यांचे मार्गदर्शनानुसार मंडळ अधिकारी मनोज कंधारे, तलाठी महेश जोशी,मोजणीदार गायके यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून नकाशानुसार रस्ता मोकळा करून दिला यासाठी भगवान जगन्नाथराव मोरे यांनी गेली 5 वर्षापासून पाठपुरावा केला होता,सर्व अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून व शेतकऱ्यांच्या संमतीने शेतीला जाण्यासाठी रस्ता मोकळा झाला त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे

Google Ad