भोकर मध्ये इंग्रजी शाळा कडून मोठ्या प्रमाणात फी वसुली; पावती मात्र दिल्या जात नाही….

भोकर( तालुका प्रतिनिधी )भोकर शहरात इंग्रजी शाळा गल्लीबोळात जागोजागी सुरू करण्यात आले असून पालकाकडून मोठ्या प्रमाणात फी वसुली केली जात आहे पावती मात्र दिली जात नाही अनाधिकृत इंग्रजी शाळा कडून पालकांची लूट केल्या जात आहे शिक्षण विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
भोकर शहरात काही इंग्रजी शाळांची परवानगी आहे मात्र तिथे 30 ते 40 हजार रुपयापर्यंत विद्यार्थ्याकडून फी वसुली केली जाते,पुस्तके शाळेतच घ्यावी लागतात,शूज शाळेतच घ्यावा लागतो इतर साहित्य शाळेतच घ्यावे लागते, इंग्रजी शाळांच्या नावाखाली पालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुट केल्या जात आहे ,आपला पाल्य दर्जेदार शिक्षण घेऊन उच्चशिक्षित व्हावा ही पालकांची अपेक्षा असते काही शाळांमध्ये मात्र अप्रशिक्षित शिक्षक ठेवल्या गेले आहेत, दहावी बारावी पास असलेल्या शिक्षिका ठेवण्यात येतात काही अनाधिकृत शाळांनी तर उच्छाद मांडला आहे इंग्रजी शाळांचा बाजाराच सुरू केला असून परवानगी नसताना सुद्धा इंग्रजी शाळा चालविल्या जातात
पावती नदेता चालतो कारभार; शिक्षण विभागाचे दुर्लक्ष.
भोकर शहरात परवानगी असलेल्या नामांकित इंग्रजी शाळांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांकडून फी वसुली केली जाते मात्र त्याची पावती दिल्या जात नाही वेगवेगळ्या वस्तू खरेदीच्या नावाखाली ही फीस वसूल केल्या जाते याबाबत शिक्षणा विभागाने चौकशी करणे गरजेचे आहे अनधिकृत इंग्रजी शाळा काढून सुद्धा मोठ्या प्रमाणावर भोकर शहरात गल्लीबोळात सुरू झालेल्या शाळा पावती न देता मोठ्या प्रमाणावर फी वसुली करत आहेत याबाबत शिक्षण विभागाला तक्रार करून देखील सदर शाळांची चौकशी होत नाही इंग्रजी शिक्षणाचा बाजार मांडून वसुलीचा धंदा करणाऱ्या अनाधिकृत इंग्रजी शाळांची चौकशी होणे गरजेचे आहे