दै.रोखठोक समुहातर्फे बहुजन नेते घिसेवाड यांना “महाराष्ट्र भुषन” तर शेंडगे बापू यांना “समाज रत्न” पुरस्कार जाहीर –
भोकर (प्रतिनीधी)
भोकर येथील बहूजन चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते माजी सभापती नागनाथराव घिसेवाड यांना “महाराष्ट्र भुषण” पुरस्कार तर ओबीसी बहूजन चळवळीतील अग्रणी जेष्ठ कार्यकर्ते नागोोराव शेंडगे बापू यांना “समाज रत्न” पुरस्कार दै.रोखठोक वृतपत्र समूह कोल्हापूर तर्फे नुकताच जाहिर करण्यात आला आहे.भोकर तालूक्यातील नागनाथ घिसेवाड व नागोराव शेंडगे बापू यांनी बहूजन,वंचित, उपेक्षित ,दबल्या, पिछड्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी व संविधानिक हक्क अधिकारासाठी अहोरात्र परिश्रम घेत संघर्ष केला.त्याच बरोबर सामाजिक, राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल दै.रोखठोक वृतपत्र समूह कोल्हापूर परिवारातर्फे दै.रोखठोक च्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील निस्पृह वृतीने सेवाभावी कार्य करणाऱ्या नामांकीत व्यक्तींना दि.१४ जुलै २०२४ रोज रविवारी “शाहू स्मारक भवन,दसरा चौक कोल्हापूर” येथे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून नांदेड जिल्ह्यातील घिसेवाड व शेंडगे बापू यांना पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांचे चाहते व मित्र परिवार हितचिंतक परिवारातर्फे सर्वत्र अभिनंदन होत आहे.