खा.अशोकराव चव्हाणांनी भोकर मतदार संघाच्या विकास केला नाही- लोकनेते दादाराव पाटील ढगे.इंजि कु दामिणी दादाराव ढगे भोकर विधानसभा मतदारसंघातून लढविणार…..

खा.अशोकराव चव्हाणांनी भोकर मतदार संघाच्या विकास केला नाही- लोकनेते दादाराव पाटील ढगे.
इंजि कु दामिणी दादाराव ढगे भोकर विधानसभा मतदारसंघातून लढविणार…..

भोकर विधानसभा मतदारसंघातून इंजि कु. दामिनी दादाराव ढगे काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असून पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविणार असल्याची माहिती भोकर येथील पत्रकार परिषदेत दादाराव ढगे यांनी दिली दिली आतापर्यंत दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवाराला विजयी करून जनतेने विधानसभेत पाठवले निवडून येताच त्या उमेदवाराने सामान्य जनतेशी संपर्क तोडला काही निवडकच जणांशी संपर्क ठेवत विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या निष्ठाण मतदारांना डावलण्याचे काम केले भोकर मतदार संघातून निवडून येऊन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचल्यानंतर भोकर तालुक्यात सिंचनाचे कोणतेही काम न केल्यामुळे हा तालुका अजून कोरडाच आहे. खासदार अशोकराव चव्हाण साहेबांनी भोकर मतदार संघाच्या विकास केला नाही. एमआयडीसी असून सुद्धा कोणतेही कारखाने न आणल्यामुळे येथील युवक मोठ्या प्रमाणावर कामासाठी हैदराबाद पुणे या महानगरामध्ये कामासाठी जातात गेल्या वीस वर्षापासून मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना भोकर हा सर्वात मोठा तालुका असून सुद्धा तालुक्यात उच्च शिक्षणासाठी कोणतीच सोय त्यांनी केलेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुणे बारामती आधी ठिकाणी जावे लागते मतदार संघात मोठ्या प्रमाणावर निधी आणून हलक्या दर्जाचे कामे करून शासकीय निधीचा दुरुपयोग त्यांचे कार्यकर्ते करतात म्हणून यावेळेस मतदार संघाच्या जनतेने भूमिपुत्राला संधी द्यावी अशी मागणी केली मी याच मतदारसंघातील असल्यामुळे जनतेचा माझ्या मुलीला कुमारी इंजिनियर दामिनी दादाराव पाटील ला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहेत काँग्रेस पक्षाने जर संधी दिल्यास संपूर्ण ताकतीने निवडणूक लढवू जर संधी मिळाली नाही तर पक्षाने जे कोणी उमेदवार देईल त्यास निवडणूक निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेल असेही दादाराव पाटील ढगे म्हणाले

Google Ad