नागनाथ घीसेवाड, नागोराव शेंडगे यांना कोल्हापूर मध्ये पुरस्कार प्रदान

भोकर (तालुका प्रतिनिधी) बहुजन समाजासाठी काम करणारे लोकनेते नागनाथ घीसेवाड यांना महाराष्ट्र भूषण तर ओबीसी नेते नागोराव बापू शेंडगे यांना समाज भूषण पुरस्कार देऊन कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले.
समाजात बहुजन समाजासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक सेवा देणाऱ्या लोकांसाठी कोल्हापूर येथील दैनिक रोखठोकच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते चालू वर्षी 14 जुलै 2024 रोजी हा पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथील शाहू महाराज सभागृहात संपन्न झाला आय आर एस अप्पर आयुक्त चेन्नई समीर वानखेडे व सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर, संपादक सुरेश माडकर यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल श्रीफळ देऊन भोकर तालुक्याचे बहुजन नेते नागनाथ घीसेवाड, नागोरावजी शेंडगे यांचा गौरव करण्यात आला यावेळी कार्यकारी संपादक सुरेश राठोड निवासी संपादक सुशील अग्रवाल यांच्यासह भोकरचे ज्येष्ठ पत्रकार एल. ए. हिरे, बी. आर. पांचाळ, शिवसेनेचे सुभाष नाईक, दत्ता बोईनवाड, यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती

Google Ad