मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा शिवसेना तालुकाप्रमुख अमोल पवार
राज्यातील महायुती सरकारने महिलांचा विचार करत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला असून संपूर्ण राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे सुरू आहे भोकर विधानसभा मतदारसंघातील महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना भोकर तालुकाप्रमुख अमोल धनराज पवार यांनी केले आहे
जास्तीत जास्त महिलांनी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घ्यावा, यादृष्टीनं राज्य सरकार कडून प्रसार माध्यमातून योजनेची प्रसिद्धी करत आहे. वर्तमानपत्रांसह फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू ट्यूब, व्हॉट्सॲप अशा समाज माध्यमांतूनही योजनेची माहिती प्रसारित करण्यात येत आहे
महाराष्ट्रात ‘लाडली बहिण योजना’ लागू झाल्यापासून योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. 21 ते 65 वयोगटातील विवाहित महिला, घटस्फोटित, निराधार महिला यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रत्येक कुटुंबातील एकच महिला याचा लाभ घेऊ शकतात.ज्या कुटुंबांकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजनेत सहभागी होऊ शकतात. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा आउटसोर्स, स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असतील.