मयुरी सोनवणे एमएससी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ॲनालिस्टची लागली नोकरी..
धुळे तालुक्यातील मूळ न्याहाळोद येथील रहिवासी मयुरी सोनवणे विज्ञान शाखेतील पदवित्तर पदवी एमएससी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली व कॅप जेमिनी मध्ये ॲनालिस्ट म्हणून नोकरी लागली. सोनवणे जिथे जातात तिथे सोने पेरतात ही म्हण तिने सार्थ करून दाखवली.आदिवासी टोकरे कोळी जमातीत तिने मानाचा तुरा रोवला आहे.तिला लहानपणापासूनच कॉम्प्युटर व सॉफ्टवेअरची विशेष आवड आहे.तिच्या वडिलांकडून तिला शिक्षणाची प्रेरणा मिळाली.तिने घेतलेले अथक परिश्रम व जिद्दीच्या जोरावरच तिला घवघवीत यश आले आहे.तिच्या या यशाबद्दल सोनवणे घराण्याची व न्याहाळोदकरांची मान उंचावली आहे.तिने पहिल्याच पगारात वडिलांना दहा हजाराचे कपडे घेऊन पितृऋण फेडले आहे.ती स्वतःच्या पायावर उभी राहिली याच्या तिला स्वार्थ अभिमान आहे.ती आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष-प्रा.मोतीलाल सोनवणे यांची मुलगी आहे.मुख्याध्यापक के.सी खैरनार सर,माजी सरपंच कैलास पाटील,माजी उपसरपंच देविदास रायते,ॲड चुनीलाल रोकडे, आदर्श शेतकरी कैलास रोकडे,आदर्श शिक्षक विकास पवार, कैलास पवार, रूपचंद वाघ, गणेश धोबी, दिगंबर अमृतकर, हनीफ खाटीक, पत्रकार विशाल रायते, पत्रकार दिलीप साळुंखे, पत्रकार संजय महाजन, पत्रकार विजय मोरे नांदेड, यांनी तिचे कौतुक केले.*