रेल्वे अंडरग्राउंड मध्ये पाणी जमा झाल्याने एक बाजू महिनाभरापासून बंद रेल्वे अंडरग्राउंड चालू करा अन्यथा मत्सपालन करण्याची परवानगी दया :-एजास कुरेशी
भोकर प्रतिनिधी )
भोकर शहरातील रेल्वे भुयारी मार्ग सुरू होऊन दोन वर्षाच्या कालावधी लोटला दोन वर्षातच या बोगस कामाचे पितळ उघडे पडले असून भुयारी मार्ग जागोजागी खड्डे पडले असून त्या खड्ड्यामध्ये पाणी जमा झाले आहे.वाहनधारकासाठी सोयीचे व्हावे यासाठी रेल्वेने विभागाच्या वतीने अंडरग्राउंड भुयारी मार्ग बांधून काही वर्षांपूर्वी प्रवासासाठी सुरू करण्यात आले होते परंतु पावसाचे पाणी निघण्यासाठी व्यवस्थित रित्या व्यवस्था करण्यात आले नसल्यामुळे पावसाचे पाणी त्या भुयारी मार्गातच महिनाभरापासून जमा आहे. त्या पाण्यामुळे प्रवाश्याना ये जा करण्यासाठी एकच भुयारी मार्ग उपलब्ध असल्याने छोटे-मोठे अपघात दररोजच होत आहे. वारंवार सूचना देऊन सुद्धा संबंधित विभागाच्या वतीने काहीही उपाययोजना करण्यात आल्या नाही. पाणी सलग एक महिन्यापासून तेथे जमा आहे. संबंधित विभागाने त्या भुयारी मार्गातून पाणी काढले नाही तर त्या पाण्यामध्ये मस्त पालन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जनजागृती माहिती अधिकार समिती चे नांदेड जिल्हा अध्यक्ष एजाज कुरेशी यांनी केली आहे