पिंजारी जातीच्या जात प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करणार_निहाल अहेमद मन्सूरी
भोकर (लतीफ शेख) मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात वास्तव्य असणाऱ्या व गादी पिंजून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मुस्लिम धर्मातील पिंजारी ही जात ओबीसी ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असून त्यांच्या जात प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या अडीअडचणी दूर करून त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पिंजारी मंसूरी लदाफ या संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष निहाल अहेमद मन्सूरी यांनी दिले आहे.दि 26जुलै रोजी शुक्रवारी भोकर शहरातील रेल्वे स्टेशन जवळील संगम मंगल कार्यालयात पिंजारी लदाफ मंसूरी या संघटनेचा मेळावा घेण्यात आला या मिळाव्याला शेख जैनुद्दीन पिंजारी दुगावकर उपाध्यक्ष,पिंजारी अन्वर भाई खडकपुरा नांदेड शहर प्रमुख,शेख रौफ भाई पिंजारी कांडलीकर उपशहर प्रमुख,अॅड. जफर भाई पिंजारी महानगर प्रमुख,,शेख हफीज भाई पिंजारी कांडलिकर उपमहानगर प्रमुख नांदेड
बबलू पिंजारी बारडकर भोकर विधानसभा अध्यक्ष,हाजी अहेमद साब पोलवाले,शेख नन्हूसाब,हाजी अब्दूल वहिद ,शेखलाल भाई गुत्तेदार,कासीम भाई रिटायर्ड रजिस्ट्रार,अहेमदभाई कोळगावकर,मुस्तफा भाई पोलिसवाले,बाबुभाई.नागापूरकर,ईस्माईल मिस्त्री,सलिम भाई कोळगावकर,महेबूब खुन्शावली, मौलामिया खाज्यामियाॅ रावणगांवकर,ईब्राहीम साहब रावनगांवकर,आदिंची उपस्तिथी होती
पुढे बोलताना निहाल अहेमद मन्सूरी म्हणाले की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील गेल्या एका वर्षापासून मोर्चे आंदोलने उपोषण करत आहेत पण आपण मुस्लिम धर्मातील पिंजारी जातीमध्ये जन्म घेऊन जन्मापासूनच ओबीसी प्रवर्गात असून सुद्धा त्याचा लाभ घेत नाही समाजाचा लाखो लोकांकडे जातीचे प्रमाणपत्र नाही सर्वांनी आपापल्या जातीचे प्रमाणपत्र काढावे आपल्या मुला मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे उच्च शिक्षणासाठी जे काही अडीअडचणी येतील ते आमची संघटना सोडविण्यासाठी प्रयत्न करेल ज्या ठिकाणी आर्थिक मदत लागेल त्या ठिकाणी आम्ही आर्थिक मदत सुद्धा करू असेही ते म्हणाले यावेळी समाजाची नवनियुक्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली भोकर तालुका अध्यक्षपदी शेख उमर पिंजारी,उपाध्यक्ष रफिक कोळगावकर,सचिव गौस भाई,सहसचिव महेमूद गादिवाले, खादरी,कोषाध्यक्ष सरवरभाई ,भोकर शहरअध्यक्ष पदी ,शेख ईमरान ,उपाध्यक्ष फारूक पाशामिया,प्रवक्ता जलिल हैदर भाई,मिडीया प्र.लतीफ शेख,सद्दाम हुसेन मन्नानभाई आदिंची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भोकर शहर व तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व पिंजारी बिरादरी च्या युवकांनी परिश्रम घेतले