इंजि.विश्वंभर पवार यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक विविध प्रश्नांनी गाजवली
भोकर तालुक्याच्या प्रलंबित विकास कामांचे मांडले प्रश्न
भोकर( तालुका प्रतिनिधी) जिल्ह्याच्या विकासासंदर्भात महत्वपूर्ण कामांसाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक 27 जुलै रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्य इंजि.विश्वंभर पवार यांनी भोकर तालुक्याच्या प्रलंबित विकास कामांचे प्रश्न मांडून बैठक गाजवली. शेतकऱ्यांच्या खात्यावर विनाअट पीक विम्याची रक्कम जमा करा, जिल्ह्यात नवीन बसेस द्या,मनरेगातून रोजगार उपलब्ध करा, रेल्वे गाड्यांची संख्या वाढवा,पुनर्वशीत गावांचे प्रश्न मिटवा, खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी करून भोकर सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे यांच्याकडे नांदेड अधीक्षक कार्यालयाचा अतिरिक्त पदभार असल्याने येथील कारभार विस्कळीत झाला आहे राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची कामे अर्धवट असल्याने अपघात वाढले आहेत, भोकर ग्रामीण रुग्णालयात काही डॉक्टर हजर राहत नाहीत,ॲम्बुलन्स असले तर चालक नाहीत रुग्णांची हेळसांड होत आहे, भोकर येथील एम आय डी सी मध्ये रस्त्याचे काम सुरू झाले असून तेथे उद्योगासाठी जागा उपलब्ध करून द्यावी,भोकरला पॉलिटेक्निक कॉलेज उभारण्यात यावे ,बाभळी बंधाऱ्याच्या शेतकऱ्यांचे अनुदान देण्यात यावे, शेतमजुरांना देखील विमा लागू करण्यात यावा तालुकास्तरावर पत्रकार भवनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा विविध प्रश्नांचा भडीमार करून सभागृहाचे लक्ष वेधले अनेक अधिकारी मात्र या प्रश्नांच्या भडीमाराने निरुत्तर झाले होते. भोकर विधानसभा मतदार संघात इंजि.विश्वंभर पवार यांनी जनसेवेची कामे हाती घेतली असून ग्रामीण भागातील प्रत्येक गावात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत आरोग्य शिबिर घेऊन ग्रामीण भागातील रुग्णांना मदत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय साहित्याचे वाटप वृक्षारोपण आदी कामे हाती घेऊन जनसामान्यांच्या प्रश्नासाठी परिश्रम घेत आहेत