आदिवासी या देशाचे मूळ मालक-प्रा.मोतीलाल सोनवणे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार ४७ जमाती आदिवासी साठी पात्र आहेत. आदिवासी कोळी,ढोर टोकरे कोळी,कोळी महादेव,डोंगर कोळी,कोळी मल्हार,भिल्ल, ठाकूर,वारली,कातकरी अशा ४७ जमाती देशाचे मूळ रहिवासी म्हणजेच मूळ मालकआहेत.मूळ भूमिपुत्रआहेत.मुंबई ॲक्ट (३)१८७४ नुसार हलके वतन म्हणजे इनाम वर्ग६ ब चे मालक आहेत म्हणजेच मूळ आदिवासी जमीन धारक आहेत. त्यांच्या जमिनीला आदिवासी कोळी इनाम, आदिवासी भिल्ल, आदिवासी ठाकूर इनाम, महार इनाम असे म्हणतात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३६ व ३६ अ चा अधीन असा शेरा ठेवण्यात ठेवण्यात आला आहे. म्हणून या आदिवासींची जमीन बिगर आदिवासी खरेदी शकत नाही. या आदिवासींची वस्ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे.
महाराष्ट्राची वसाहत या राजवाडे लेखसंग्रहातील लेखांमध्ये नागांच्या भ्रमंतींच्या, त्यांच्या वसाहतींचा, आणि त्यांच्या भाषेच्या समिश्रनाचा उल्लेख आला आहे. याच लेख संग्रहात महाराष्ट्र उत्तर कोकणची वसाहत या लेखात मांगेला, वारली, ठाकूर कातकरी, कोळी या आदिवासींचा उल्लेख आहे. पाणिनी पूर्व व उत्तरकाळात महाराष्ट्रात वस्ती करून असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.उत्तर कोकणात आर्यांच्या वस्तीपूर्वी वारली, कोळी, ठाकूर हे लोकांची वस्ती होती असा उल्लेख आहे.