मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे अंगणवाडीत मुलांना मिळतें किडे पडलेले खाऊ…
मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे अंगणवाडीत शिक्षण घेत असलेल्या मुल मुलीना जे शासनाने राबवित आहे त्या योजना मधुन मुलाना खाऊ म्हणून देत आहेत त्या खाऊ मध्ये कीडे असलेल्या खाऊ मुलांना खायला देत आहेत.म्हणुन अंगणवाडी कर्मचारी जे खाऊ बनवतात त्यांच्या वर कायद्याशीर कारवाई केली पाहिजे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड सौ.पुजाताई माधव पाटील व्यवहारे यांनी देले.
निवेदनात असे म्हटले की
डोंगरगाव येथील अंगणवाडीतील सेविका झोपेत खाऊ बनवत आहेत की काय.. गावातील
लेकरांचे आरोग्य आहे धोक्यात, अंगणवाडीतील खाऊ मध्ये भोंगे किडे असल्याचा प्रकार आज गावातील काही महिलांनी उघड केला आहे.अनेक दिवसांपासून खाऊ व्यवस्थित शिजवा किंवा खाऊ बघून शिजवा अशी सूचना करूनही वारंवार अंगणवाडीतील सेविका ऐकत नाहीत फोन केला नेऊन दाखवले तर उद्धटपणे उत्तर देत आहेत.प्रायव्हेट शाळेमध्ये लेकरांना टाकायचं नाही कारण गावातील शाळेत.जिल्हा परिषद शाळेत शिकेल कोण हा प्रश्न पडतो म्हणून काही लोकांची लेकरं गावात शिकत असताना सुरक्षित आहेत का, त्यांना जो आहार दिला जातो तो आहार व्यवस्थित शिजवला जात आहे का याकडे पण लक्ष दिलं पाहिजे, खाऊ शिजवताना झोपेत शिजवतात का असा प्रश्न डोंगर गावातील माता-भगिनींना
पडला आहे, आम्ही आमच्या लेकरांना कसं शाळेत पाठवायचं हा प्रश्न डोंगरगावातील महिला करत आहेत वारंवार सूचना देऊनही अंगणवाडी सेविका ऐकत नसतील तर गावातील अंगणवाडीत जाणाऱ्या
लेकरांचा करायचं काय.विचारलं असता अशी उत्तरे मिळतात. असतील आले असतीलकिडे येतात,अशी उत्तर उलट सुलट उत्तर देत आहेत, हा भोंगा किड्यांचा खाऊ आमचे लेकरं बिमार पडतात.घटनेची
चौकशी करून या प्रसंगी तत्काळ कारवाई अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड सौ.पुजाताई माधव पाटील व्यवहारे व या निवेदनात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षरी नमूद करण्यात आली आहे.