भोकर तालुक्यातील मातुळ येथील पीडित कुटुंबीयांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने ५१,००० हजार रुपयांची आर्थिक मदत..
भोकर तालुक्यातील मातुळ येथील कोळी समाजातील अत्यंत बिकट परिस्थिती असलेल्या मयत भोजराम विठ्ठल रूमनवाड यांच्या कुटुंबीयांना दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांनी रूमनवाड कुटुंबांचे सांत्वन करून त्या कुटुंबांना सामाजिक भावनेतून ५१,००० हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली.
मागील दि.३१ जुलै २०२४ रोजी रूमनवाड कुटुंबातील कुटुंब प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्याने रूमनवाड कुटुंबात कुटुंब प्रमुख म्हणून व्यक्ती नसल्याने त्या कुटुंबांचा सर्व भार घरातील तीन महिलेवर आल्याने रूमनवाड कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांच्याशी संपर्क साधून रूमनवाड कुटुंबाची सत्य परिस्थिती सांगून त्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात यावी असे निरोप दिले असता. दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी मयत भोजराम विठ्ठल रूमनवाड पीडित कुटुंबाची दादाराव पाटील ढगे यांनी भेट घेऊन सांत्वन करून ५१,००० हजाराची आर्थिक मदत करण्यात आली.दादाराव पाटील यांनी रूमनवाड कुटुंबियांना आर्थिक मदत केल्याबद्दल मातुळ गावकऱ्याच्या वतीने दादर पाटील यांचे आभार मानण्यात आले.यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे, जीवन नाईक, गोविंद पाटील ढगे,आनंद पाटील मगरे, ओमकार पाटील ढगे, माधव पाटील ढगे, तसेच मातुळ येथील उपसरपंच माधवराव रामा बोईनवाड, संजय कदम, साहेबराव कदम, सतीश कदम, जनार्धन कदम, तुळशीराम कदम, उदय खुळे, यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती.