९२७ कोटी रुपयांचा निधी आणुन भोकर तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलणार विकासभिमुक नेतृत्व खा.अशोकराव चव्हाण – पालकमंत्री गिरीष महाजन…
भोकर तालुक्याच्या विकासासाठी ९२७ कोटी रुपयांचा तर संत सेवालाल व संत रामराव महाराज यांच्या स्मारकासाठी सात कोटी निधी मंजूर करुन आणुन तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलणार विकासभिमुक नेतृत्व म्हणजे खा.अशोकराव चव्हाण असल्याने मत नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भोकर येथील विविध कार्यक्रम उद्धाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
भोकर तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचा विविध विकास निधीचे भुमीपुजन.उद्घाटन कार्यक्रम शनिवारी दि.ऑगस्ट २०२४ रोजी पालकमंत्री गिरीश महाजन व खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते दिवसभर करण्यात आले.मंजुर ९२४ कोटी निधी सह यामध्ये भोकर विश्रामगृहाचे लोकार्पण सोहळा तसेच सा.बां.विभाग कार्यालय इमारतीचे उद्घाटन,पिंपळढव धरण साठवण तलाव,सुधा प्रकल्पाची उंची वाढवणे,सोमठाणा,किनी, पाळज,दिवशी,लघळुद,रावणगाव,पिंपळढव,बल्लाळ तांडा,धारजणी,मोघाळी,कामणगाव आदी रस्त्याचे भूमिपूजन आदी कार्यक्रम संपन्न झाले.तसेच संत सेवालाल व संत रामराव महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आणि बंजारा समाजाचा भव्य मेळावा घेण्यात आला.विवीध कामाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले.तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की,भोकर तालुक्यात ९२४ कोटीची कामे मंजूर करुन माजी मुख्यमंत्री राहीलेले खा.अशोकराव चव्हाण विकास पुरुष आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात खूप निधी खेचून आणला आणि माझ्या मतदारसंघात एवढा निधी मी कधी आणला नाही. एक अनुभवी राजकारणी आणि दिग्गज नेतृत्व म्हणून अशोकराव चव्हाण यांची ओळख आहे.त्यामुळे मतदार संघातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे तर आपल्या मतदार संघाचे भवितव्य आहे.तसेच महिलांसाठी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणली आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा ही केले जात आहे.परंतु हि योजना बंद पडेल असे अफवा विरोध करीत आहेत. योजना कदापि बंद पडू देणार नाही.म्हणत या मतदारसंघात शंकराव चव्हाणानंतर अशोकराव आणि आता त्यांच्या कन्या श्रीजया आमदार होणार आहेत. राजकारणात चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी येत आहे असल्याने त्यांच्या पाठीशी मतदारानी राहीले पाहिजे असे ते म्हणाले. मागील दहा वर्षात मोदी सरकारने लोकाभिमुख योजना राबबुन सर्वसामान्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. तर राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी एस.टी प्रवासात सूट, मुलींना मोफत शिक्षण, युवकांसाठी, शेतकऱ्यां साठी विविध योजना आणल्याचे ते म्हणाले.विवीध उद्घाटन अध्यक्ष पदावरून बोलताना खा.अशोक चव्हाण म्हणाले, माझ्या मतदारसंघातील भोकर तालुक्यात पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याने मी या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे स्वस्त बसणार नाही पिंपळढव साठवण तलाव असो की सुद्धा प्रकल्पाची उंची वाढवण्याचा कामासाठी अनेक अडचणी आल्या गोदावरी सुधा खोऱ्यात पाणी उपलब्ध नसल्याने संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. तरी पण मी सातत्याने पाठपुरावा करून पाणी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून देत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी भांडावे लागले. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हे काम आता मार्गी लागत असल्याचा आनंद होत आहे. पिंपळढव साठवण तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला लवकरच मिळणार आहे भोकर तालुक्यात जलजीवांची कामे चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले त्याकडे लक्ष देऊन प्रत्येक गावात पाणी आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी असेपर्यंत विकासाची कामे आडणार नाहीत. मी मतदारांच्या भावनांची कदर करणारा आहे. आम्ही तुमची काळजी करू मतदारांनाही आमची काळजी करावी अशी आवाहन केले. विकास कामे होत असताना काही विघ्नसंतोषी मंडळी अडथळा आणण्याचे हेतू पुरस्कृत करीत आहेत. मात्र मतदार शहाणे आहेत पोटसुळ उठलेल्यांचा इलाज माझ्याकडे आहे मी ते पाहून घेईल काही झालं तरी विकास कोणीच रोखू शकत नाही. आदी लोकांची कामे करा मग विरोध करीत बसा या भागातील मतदारांनी आजपर्यंत आम्हाला मानाचे स्थान दिले आहे. आता श्री जयाने जनतेच्या भल्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे तिला तुमचा आशीर्वाद हवा आहे.बंजारा समाजाच्या विकासासाठी मी कटीबद्ध आहे.तुम्ही श्रीजया पाठीशी खंबीरपणे उभे रहावे अशी आशा करतो असे शेवटी खासदार अशोक चव्हाण म्हणाले.या विविध कार्यक्रमास खा.डॉ. अजित गोपछडे, माजी आ.अमिता भाभी,श्रीजया चव्हाण, माजी आ.अमर राजूरकर, आ.तुषार राठोड,मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, मारोतराव कवळे, किशोर देशमुख, जगदीश पाटील भोसीकर, किशोर स्वामी, संजय लहानकर,मा जि प.अध्यक्ष मंगाराणी आंबुलगेकर, मारुती बल्लाळकर, दिलीप देशमुख सोमठाणकर, गणेश पा. कापसे किशोर पा. लगळुदकर, बाबुराव सायाळकर, राजू पा. दिवशीकर, सरपंच संघटना अध्यक्ष मारोतराव पा.भोबें, गणपत पिटेवाड, राजेश देशमुख, आनंद डांगे, रोहिदास चव्हाण, आमदार तुषार राठोड, बाबू सिंग महाराज, दीक्षा भाऊ, प्रेम सिंग महाराज,पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, भगवान दंडवे, डॉ. राम नाईक. डॉ.उत्तम जाधव, काँग्रेसचे राजेश्वर देशमुख, संचालक रामचंद्र मुसळे, गोविंद पाटील यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.