विशाल रायते यांच्या झाडे देऊन अनोखा वाढदिवस साजरा-प्रा. मोतीलाल सोनवणे

गुरुवार दिनांक २२/८/२०२४ रोजी न्याहाळोद येथील कुस्तीचे भीष्माचार्य देविदास जयराम रायते यांचे सुपुत्र,आदर्श पत्रकार विशाल रायते यांच्या वाढदिवस आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या घरी निसर्गरम्य बगीचा मध्येशाल,श्रीफळ,बुके,पिंपळ, चिक्कू अशोक वृक्ष देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.ज्या वेळी त्यांनी कार्यक्रमात प्रवेश केला त्यावेळी टाळ्या वाजवून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात.आले.त्यावेळी आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असे वातावरण निर्माण झाले होते.झाडे ही माणसाला ऑक्सिजन,फुले,फळे,लाकूड
अन्न,औषधे,सावली,देतात.पक्षी व प्राणी यांना निवारा देतात. झाडांमुळे पाऊस पडत असल्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावावीत म्हणून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला.
वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा.मोतीलाल सोनवणे म्हणाले की,विशाल शब्दाचा अर्थच भव्य आणि दिव्य आहे.त्यांच्या नावातच भव्यता आणि दिव्यता आहे.ते प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात.त्यांचे भावी आयुष्य सुखाचे,समृद्धीचे,आणि भरभराटीचे जावो अशाप्रकारे सदिच्छा व्यक्त केल्या.अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माजी सरपंच कैलास गोविंदा पाटील यांनी लहान मुलं हे मातीच्या गोळ्या प्रमाणे असतात त्यांना हवा तो आकार देऊ शकतो.लहान मुले संस्कारक्षम असतात त्यांच्यावर लहानपणी चांगले संस्कार करू शकतो.त्यांनी नमस्कार का करतात याचे महत्त्व पटवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे त्यांनी झाडाचे पालकत्व स्वीकारले असून त्यांना वाढवण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली व शेतात ती झाडे लावली.विशाल रायते यांनी सर्वांची कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी माजी सरपंच अण्णा पवार,प्रशांत अहिरे,गणेश काकु ळदे,मोनल चित्ते,सोनल चित्ते, नेहा निळे, चैतन्य ओतारी,परी वाकडे,आरश भील, फुगी कोळी, यश काकुळदे,बबन बोरसे, प्रफुल्ल बोरसे,महेश ओतारी, विष्णू भिल,कुंदन मोरे,सुनील कोळी,गायत्री भिल,होम निकम, भावेश चव्हाण,पवन कोळी,हरी शिरसाठ इत्यादी उपस्थित होते.

.

Google Ad