भोकर नगर परिषदेला मिळाले कायम अधिकारी,मुख्याधिकारी पदाचा ऋषभ पवार यांनी स्वीकारला पदभार
भोकर (तालुका प्रतिनिधी)गेली 2 वर्षापासून भोकर नगर परिषदेचा कारभार अतिरिक्त पदभारावर चालविल्या जात होता कायम अधिकारी या ठिकाणी मिळालेच नाहीत अखेर 26 ऑगस्ट रोजी मंत्रालयात कक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले ऋषभ पवार यांनी भोकर नगर परिषदेचा मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सौ.प्रियांका टोंगे यांची बदली झाल्यापासून गेली दोन वर्षापासून इथे कायम मुख्याधिकारी मिळालेच नाहीत कधी उपविभागीय अधिकारी,कधी तहसीलदार,कधी नायब तहसीलदार ,कधी दुसरीकडचे मुख्याधिकारी यांना अतिरिक्त पदभार देऊन कारभार चालविण्यात आला त्यामुळे प्रशासनाच्या कारभारात मरगळ आलेली होती,जनतेची कामे वेळेवर होत नव्हती,विकासकामे खोळंबून बसलेली होती,शहरातील वाहतूक समस्या,पाणीपुरवठा,स्वच्छता आदि कामांवर परिणाम झालेला होता जनतेची कामे देखील खोळंबून राहत होती. ऋषभ पवार यांनी स्वीकारला पदभार
भोकर नगर परिषदेला अखेर कायम अधिकारी म्हणून मंत्रालयातील कक्ष अधिकारी ऋषभ पवार यांनी 26 ऑगस्ट रोजी भोकर नगर परिषदेच्या मुख्यधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे शहरातील विस्कटलेल्या कामांची घडी त्यांना बसवावी लागेल जनतेची खोळंबलेली कामे मार्गावर आणावे लागतील शहरातील अनेक समस्या त्यांना दूर कराव्या लागतील जनतेच्या सहकार्याने आपण सर्व समस्या दूर करून चांगले काम करण्यासाठी प्रयत्नशील राहू सर्व माहिती घेऊन अडचणी दूर करण्याचा प्रयत्न राहील वयोवृद्ध लोकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही नूतन मुख्याधिकारी पवार यांनी केले आहेत