रामगिरी महाराज व आ.नितेश राने यांच्या आक्षेपार्य वक्तव्याच्या निषेधार्थ भोकर येथे धरने आंदोलन….
भोकर…. पैगंबर हुजूर मोहम्मद सल्लल्लाहू अलेही वसल्लम यांच्या संदर्भात आक्षेपार्य वक्तव्य करून धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करणाऱ्या सद्गुरु गंगातीरी महाराज व नेहमिच मुस्लिम समाजा विरोधात गरळ ओकणारे आ.नितेश राने, यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी व केद्र सरकारच्या वक्फ बिलाच्या विरोधात सकल मुस्लिम समाज भोकर च्या वतिने भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर धरने आंदोलन करण्यात आले
मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सुरू असलेल्या सप्ताह चे प्रवचन चालू असताना उपस्थित असलेल्या सर्व लोकसमक्ष थेट प्रक्षेपण असताना रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांनी मुस्लिम धर्मियांना ठेस पोहोचण्याचा उद्देशाने आपत्ती जनक वक्तव्य केले आहे व तसेच आ.राणे वारंवार मुस्लिम आ विषयी आक्षेपार्य वक्तव्य करत आहेत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होऊन सुद्धा राजकिय दबावामुळे त्या महाराजाला व आ.राणेला अटक होत नसल्याने मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे याच घटनेचा निषेधचा करण्यासाठी सकल मुस्लिम समाज भोकरच्या वतीने दिनांक 6 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यलया समोर धरने आंदोलन करण्यात आले शहरातील सर्व मुस्लिम व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन धरणे आंदोलनात सहभागी झाले
यावेळी. मौलाना रिजवानोद्दीन साहब, मुफ्ती मौलाना खुर्शीद अहमद साहब, हाफेज उमर फारूक साहब,मौलाना जुबेर साहब हाफिज शमशाद साहब मौलाना मुबीन खाॅन इनामदार आदींनी आपले विचार मांडून रामगिरी महाराज व नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला राज्य सरकारने त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी भूमिका जाहीर केली व केंद्र सरकारच्या वतीने सभागृहात मांडण्यात आलेल्या नवीन वक्फ जमिनी संदर्भातले विधेयक मागे घेण्याचे एकमुखी मागणी करून मागण्या संदर्भातले निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत महामहीम मा.राष्ट्रपती साहेब राष्ट्रपती भवन नवी दिल्ली, मा.प्रधानमंत्री साहेब प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्ली,मा. केंद्रीय गृहमंत्री साहेब गृहमंत्री कार्यालय नवी दिल्ली,मा मुख्यमंत्री साहेब ुख्यमंत्री कार्यालय मुंबई महाराष्ट्र,मा गृहमंत्री साहेब गृहमंत्री कार्यालय मुंबई ,मा जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, मा.पोलीस अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोकर, तहसीलदार साहेब तहसील कार्यालय भोकर ,मा.पोलिस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन भोकर यांना पाठविण्यात आले यावेळी.
मौलाना रिजवान सरवरी साहब, मौलाना आमेर साहब , मौलाना खालेद साहब मौलाना इमरान नदवी साहब, हाफेज आमेर साहब, हाफेज फैजान साहब,हाफेज फुरखाॅन साहब,मौलाना फहिमोद्दीन साहब,मौलाना निजाम साहब ,मौलाना हाफेज अकबर साहब,मौलाना आमेर साहब,मौलाना हाफेज शाहेद साहब,हाफेज शाहेद पटेल साहब ,मौलाना सुजाओद्दीन साहब,मौलाना जमील साहब,मौलाना मस्लियोद्दीन साहब सह आदि मुस्लिम धर्मगुरु उपस्थित होते