भोकर शहरात ईद ए मिलादून नबी(स.अ) उत्साहात साजरी

भोकर :इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर नबी ए पाक मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहू अलैही वसल्लम यांचा जन्मदिन हा ईद ए मिलादून नबी (स.अ) जगभरात उत्साहात साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भोकर शहरात भव्य जुलूस ए मोहम्मदी(शोभायात्रा) काढून उत्साहात साजरी करण्यात आली

ईद-ए-मिलाद निमित्त शहरातील सईद नगर स्थित मस्जिदे आयेशा पासून भव्य जुलूसे मोहम्मदीचे आयोजन करण्यात आले होते जुलूस मध्ये ईद्रीस सेठ , मा.उपनगरअध्यक्ष शेख युसूफ ,बाबाखान पठान,ईमरान सेठ,मिर्झा ताहेर बेग,जुनेद पटेल ताजोद्दीन भाई,हमीदखाॅन पठान,ईमरान सेठ ,जवाजोद्दीन बडबडेकर, करीम करखेलीकर,शेख साबेर अफरोज पठान,आशुभाई, ईम्तियाज ईनामदार,एजाज कुरेशी,मो अतिख सय्यद जब्बार भाई ,आशु भाई,रफिक भाई एकबाल मेकानिक आदि सहित लहान मुलासहित युवक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जुलूस रजा चौक.डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे काग्रेस कमेटी कार्यालया समोर येताच भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील कोंडलवार यांच्या वतीने फराळ व पाणी वाटप करून  ईद-ए-मिलाद कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार  करण्यात आला यावेळी युवा नेते संदीप पाटील गौड कोंडलवार,निळकंठ वर्षैवार काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष तौसीफ इनामदार ,अप्पाराव राठोड,बबलु देशमुख,गोविंद देशमुख आदिनाथ चिंताकुट्टे, सम्राट हिरे, प्रल्हाद सुंकळिकर सहित आदी उपस्थित त्यानंतर जुलूस छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे वस्ताद लहूजी साळवे चौक येथे आल्यावर त्या ठिकाणी सर्व पोलीस विभागातील उपस्तिथ अधिकाऱी कर्मचाऱ्यांचा व पत्रकार बाधंवांचा मिलाद कमिटीच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला इदगाह येथे हाफिज अकबर मौलाना यांनी देशामध्ये अमन भाईचारा कायम राहावा यासाठी प्राथर्ना केली त्यानंतर मिलाद कमेटीच्या वतीने सर्वासाठी तबरूख्ख(भंडारा)चेही आयोजन करण्यात आले होते.जुलूस यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष आतीफ (उर्फ )अत्तुभाई,उपाध्यक्ष मन्सूर पठान,सचिव नाजीम भाई,शमीमोद्दीन ईनामदार बाबुभाई तामसेकर,मजर लाला,रिजवान चाऊस,शेख अलफान,शेख फैसल,मो अजहर,शेख सलमान, सिद्दीक,मो तुराब,अमान कुरेशी,आरेफ पठान एक्बाल भाई मेकानिक, सहित आदिनी परिश्रम घेतले.जुलूस दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय औटे, राठोड मॅडम, पीएसआय सुरेश जाधव, राम कराड ,केशव राठोड, पोलीस जमादार कानगुले, जाधव, कंधारे ,गोपनीय शाखेचे गाडेकर यांनी चौख पोलिस बंदोबस्त ठेवला होता

Google Ad