ग्रामीण रुग्णालय भोकर येथे विविध 38 शस्त्रक्रिया संपन्न
भोकर :- स्मृतीशेष प्रविण वाघमारे यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त डॉक्टर्स असोसिएशन भोकर व केमिस्ट असोसिएशन भोकर, डॉ साईनाथ वाघमारे यांच्या वतीने व नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांच्या सूचनेनुसार व डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी अंडवृद्धी, हर्निया, अपेंडिक्स व शरीरावरील गाठी रुग्णाची तपासणी करण्यात आली. यामध्ये शस्त्रक्रिया योग्य रुग्णांची शस्त्रक्रिया दि.30 सप्टेंबर 2024 रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 38 रुग्णांची विविध प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये 10 अंडवृद्धी, 2 हर्निया, 4 अपेंडिक्स, 3 फिबरडोमा, 2 टगं टाय, 1 फिसूला, 1 पाईल्स व 15 शरीरावरील गाठी रुग्णाची असे एकूण 38 रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सर्जन डॉ. संतोष अंगरवार, डॉ भास्कर आवटी, भूलतज्ञ डॉ बाळासाहेब बिऱ्हाडे, डॉ अनंत चव्हाण, डॉ अस्मिता भालके, नांदेड जिल्हा रुग्णालय येथील ब्रदर सिद्धया होनमोरे , अधिपरिचारिका श्रीमती मंडल लेखा, कासेवाड शोभा, दामले कलिका, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख, लिपिक प्रल्हाद होळगे, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, अधिपरिचारिका राजश्री ब्राह्मणे, जिजा भवरे, संगीता महादळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अत्रिनंदन पांचाळ, बालाजी चांडोलकर, शेख जाहेद, शेख अल्ताफ, आरोग्य सेविका सरस्वती दिवटे, संगीता पंदीलवाड, आरोग्य कर्मचारी पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे, अनिल गवळी, बबलू चरण, दिनेश लोट, प्रकाश सर्जे, ओंम साई, सेवक, ठाकूर, हत्तीरोग कर्मचारी व्यंकटेश पुलकंठवार, विठ्ठल मोरे, गजानन कंकाळ, गणेश गोदाम, राजू चव्हाण, इंदल चव्हाण, ज्ञानेश्वर खोकले, रवींद्र चव्हाण, दत्ता गेंदेवाड आदी कर्मचारी उपस्थित होते.