भोकरमध्ये दसरा मिरवणूक व रावण दहन कार्यक्रम उत्साहात..
भोकर( तालुका प्रतिनिधी )भोकर शहरात दरवर्षी प्रमाणे पारंपारिक पद्धतीने दसऱ्याची वाजत गाजत पालखीने मिरवणूक काढून फटाक्याच्या आतिषबाजीने रावण दहन कार्यक्रम उत्साहात करण्यात आला.
भोकर शहरात 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता श्री बालाजी मंदिर येथून सर्व मानकरी यांचा दसरा महोत्सव समितीच्या वतीने सत्कार करून पालखीने मिरवणूक काढण्यात आली फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला दसरा मारुती येथे पूजन करून म्हैसा रोड या ठिकाणी रावण दहन कार्यक्रम करण्यात आला दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष नागनाथ घीसेवाड यांनी प्रास्ताविक करून दसरा महोत्सव सर्वांच्या आनंदासाठी व परंपरा जपण्यासाठी हा उत्सव करत असल्याचे ते म्हणाले तहसीलदार विनोद गुंडमवार, पोलीस निरीक्षक अजित कुंभार,भगवानराव दंडवे ,प्रा .व्यंकट माने,दिलीपराव सोनटक्के,बी.आर.पांचाळ, प्रशांत पोपशेटवार आदींनी यावेळी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या रावण दहन कार्यक्रमाच्या जागेवर अडचणी निर्माण झाल्या असून येण्यासाठी रस्ता या ठिकाणी नव्हता खोदून ठेवलेला रस्ता व नाली मुळे नागरिकांना मोठा त्रास झाला नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेण्याबाबतही उपस्थित मान्यवरांनी सूचना केल्या मानकरी प्रकाश देशमुख,श्याम जैन,बालाजी देशपांडे,प्रकाश महाराज,माली पाटील,मचकुरी यांच्यासह संतोष आलेवाड ,प्रकाश मामा कोंडलवार, दिलीप तिवारी,ऍड. परमेश्वर पांचाळ, आदींची उपस्थिती होती महिला पुरुष लहान बालके या सर्वांनी रावण दहन कार्यक्रमातील फटाक्याच्या आतिषबाजीचा आनंद घेतला