डॉ.अब्दुल कलाम हे भारत देशासाठी आखरी श्वासापर्यंत कार्य करणारे महान शास्त्रज्ञ – गुणवंत मिसलवाड
नांदेड- आपल्या भारत देशाच्या आंतरिक्ष सुरक्षा संरक्षणासाठी खूप मोठे योगदान देऊन अनेक मिसाईल अस्त्र बनवून जगात भारत देशाचे नाव उंचावणारे आखरी श्वासापर्यंत देशासाठी कार्य करणारे महान शास्त्रज्ञ म्हणजे मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. १५ ऑक्टोंबर २०२४ मंगळवार रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता भारतरत्न,पद्मभूषण, पद्मविभूषण,भारताचे ११ वे माजी राष्ट्रपती, मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची ९३ वी जयंती वाचक प्रेरणा दिन व जागतिक विद्यार्थी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात ते बोलत होते.सर्वप्रथम आगाराचे वाहतुक निरीक्षक मा.श्री.आकाश भिसे यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या
प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अग्नी-१,अग्नी-२,अग्नी-३,आकाश,नाग,
त्रिशूल या क्षेपणास्त्रांची निर्मिती केली.ते इस्त्रोचे महान वैज्ञानिक होते. अशा या महान विभूतीचा आपण सर्वांनीच आदर्श घेऊन समाजाप्रती, राष्ट्राप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वाहतुक निरीक्षक आकाश भिसे, वाहतुक नियंत्रक आनंदा कंधारे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वरिष्ठ लिपीक नितीन मांजरमकर, गुलाम रब्बानी, सौ. रेखा माचीनवार, सुनीता हुंबे, मनिषा कदम, कृष्णा पवार, संजय मंगनाळे,शिवचरण मळगे, वैष्णवी गंदेवार, प्रियंका खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रा. प. म. आगारातील कामगार – कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते