जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतली भोकर विधानसभा अंतर्गत सर्व झोनल अधिकाऱ्यांची आढावा बैठक
भोकर (लतीफ शेख)भोकर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक व नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहिर झाल्याने त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व झोनल अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेऊन त्यांना निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सुचना दिल्या दि 18 ऑक्टोबर रोजी रोजी अभिजित राऊत (जिल्हाधिकारी नांदेड) यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर या ठिकाणी विधानसभा 85-भोकर अंतर्गत सर्व झोनल अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 तसेच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक 2024 अनुषंगाने त्यांना आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणी तसेच मतदान दिवशी व त्यापूर्वी एक दिवस आधी मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने कोणकोणती कामे करणे आवश्यक आहेत याबाबत मार्गदर्शन केले तसेच मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कोणत्या संभाव्य चुका होऊ शकतात याबाबत पण सविस्तर मार्गदर्शन केले व त्या चुका होऊ नयेत यासाठी संबंधित झोनल अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन झोन मधील सर्व मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच बैठकीनंतर मा. श्री. अभिजित राऊत (जिल्हाधिकारी नांदेड) यांनी EVM मशीन ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रुमची पण पाहणी केली. यावेळी मा. श्री. प्रविण मेंगशेट्टी (निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भोकर), मा. श्री. विनोद गुंडमावर (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भोकर तथा तहसीलदार भोकर), मा. श्री. रेणुकादास देवणीकर (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भोकर तथा तहसीलदार अर्धापूर), मा. श्री. आनंद देऊळगावकर (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भोकर तथा तहसीलदार मुदखेड) व इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते.