घराणेशाहीच्या विरोधात बंड करणाऱ्या सर्व जनतेच्या सुखा दुखात साथ देणारे बहुजन नेता नागनाथ घीसेवाड यांच्या पाठीमागे – जनाधार
भोकर: भोकर विधानसभा मध्ये महाविकास आघाडी आज पर्यंत उमेदवारी जाहीर झाली नसल्याने जनतेमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे अशातच भाजपाकडून माजी मंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी बहाल करण्यात आली अनेक जण इच्छुक असताना सुद्धा त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न करून घराणेशाही आणि स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या मुलीला बळजबरीने मिळून घेतल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी नाराज झाल्या चित्र स्पष्ट दिसत आहेत अशातच काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी चाचणी चालू असताना पप्पू कोंढेकर जिल्हाध्यक्ष बी आर कदम गोविंद पाटील बाबा गोड बाळासाहेब पाटील रावणगावकर दामिनी ताई ढगे इत्यादींनी पक्षाकडे मागणी केली पक्षश्रेष्ठ कडे नागनाथ रावजी घिसेवाड यांच्या विषयी तीन विधानसभा लढण्याचा अनुभव जिल्हा परिषद मार्केट कमिटी इत्यादी राजकीय अनुभव असल्याने जनतेची मागणी होती त्यामुळे जनतेच्या आग्रहास्तव नागनाथ रावजी घिसेवाड यांचे नाव आघाडीवर होते पण सूडबुद्धीचे राजकारण करून आज पर्यंत भोकर विधानसभा मध्ये मायनॉरिटीचा उमेदवार देण्यात आलेला नाही घराणेशाही यातच सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्यानं मत विभागणी करण्यासाठी अनेक ओबीसी उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न चालू आहे! म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघातील जनतेने याकडे सद्सद्विवेक बुद्धीने लक्ष घालून पक्ष न पाहता बहुजन समाजाचा कोणीही उमेदवार असो त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करावा अशी सर्व सामान्य जनतेमध्ये चर्चा ऐकवयास मिळत आहे आता मात्र एस सी ओबीसी एनटी एसटी इतर मागासवर्गीय जनता जागृत झाल्याचे चित्र भोकर विधानसभा मध्ये निर्माण झाले आहे