इंजि. विश्वंभर पवार यांनी रक्तदान करून केले नामनिर्देशनपत्र दाखल

भोकर (प्रतिनिधी) येथील समाजसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार पाटील यांनी आज () हमाल मापाडी व शेतकऱ्यांना वंदन व त्यांचा सत्कार करून तसेच स्वतः रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे..

85 – विधानसभा मतदारसंघासाठी आज(दि.२८) पर्यंत एकूण 68 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असून यात प्रामुख्याने चौथ्या आघाडीचे नागनाथ घिसेवाड यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु यात विशेष आकर्षण ठरले ते अपक्ष उमेदवार इंजि.विश्र्वांबर पवार… ते नामनिर्देशन पत्र भरण्या अगोदर सकाळी येथील मोंढा मैदानात शेतकरी, हमाल,मापाडी यांना साष्टांग दंडवत करुन तसेच त्यांचा सह्रदय सत्कार करून भव्य रॅली काढत स्वतः व अन्य 30 हितचिंतकांनी रक्तदान करून नामनिर्देशन पत्र दाखल केले यामुळे या अभिनव उपक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे.

भोकर मतदार संघातील विविध बड्या पक्षाने राजकारणाचे वेगवेगळे हातखंडे वापरून शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी इंजिनीयर विश्वंभर पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सामाजिक भान ठेवत शेतकऱ्यासह हमाल मापाडी यांना दैवत मानून त्यांच्या समोर नतमस्तक होत सामाजिक दायित्वाची जानी ठेवल्याने त्याची संपूर्ण परिसरात एकच चर्चा होत आहे.

इंजि. विषयावर पवार यांची विविध सामाजिक कार्याचे माध्यमातून भोकर मतदार संघात ओळख आहे. त्यांनी कोरोना काळात केलेली नागरीकांना केलेली मदत, आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना दिलेला आधार,पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड व जलसंवर्धन ही कामे सर्वश्रुत आहेत. सातत्याने जनमानसात राहणारा समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादीत काम करताना महायुतीकडून भोकर विधानसभा मतदारसंघाची सीट भाजपासाठी घोषित झाल्याने ते अपक्ष लढवण्याचा निर्णय घेऊन आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गोरगरीब दीनदलित मुस्लिम, आदिवासी यांच्या न्याय हक्कासाठी, येणाऱ्या काळात प्रतिनिधित्व करणार असून मतदारांनी क्षणीक सुखासाठी शाश्वत विकासला बगल देऊ नये असे भावनिक आवाहन पत्रकार परिषदेत करुन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचा पाठिंबा मिळणार असल्याचे जाहीर केले. सदर पत्रकार परिषदेस इंजि. पवार यांचे अनेक समर्थक उपस्थित होते

Google Ad