तालुक्यातील भुमीपुत्र अपक्ष उमेदवार भिमराव दुधारे निवडणुकीच्या रिंगणात स्व :बळावर लढविणार..
अपक्ष उमेदवार भिमराव दुधारे मतदार संघात जनता जनार्दनाच्या गाठीभेटी घेत संवाद साधत असुन शहरी व ग्रामीण भागात वाढता पांठीबा मिळत आहे .वयाच्या एकीसाव्या वर्षापासून राजकारणात सक्रिय असून मागील काळात ग्रामपंचायात कार्यालय भोकर चे सदस्य पदावर निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भोकर तालुक्यातील जनसामान्यांना न्याय मिळवून दिला .नौकरीच्या मागे न लागता राजकीय छंद असल्यामुळे राजकारणात सहभाग नोंदवून सामाजिक बांधीलकी जपत समाजात विधायक कार्ये केले .डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या काळात दलीत पँथर्स चळवळीत सक्रिय राहून सहभाग नोंदविला .विद्यापीठ नामांतर आंदोलन काळात नांदेड येथे १२वीला कॉलेजला शिकत असताना १७ दिवस नाशीक कल्याण येथे जेल भोगावी लागली .भिमराव दुधारे सोबतची मित्रमंडळी विजय कावळे कवी साहित्यक अनुरत्न वाघमारे पेंटर पंढरीनाथ मुनेश्वर होते .
भारिप बहुजन महासंघ पक्ष कांग्रेस राष्ट्रवादी पक्ष बिआरएस पक्ष वंचित बहुजन आघाडी पक्ष राष्ट्रीय कांग्रेस पक्षातील रणनीती अनुभवली . पक्षांतर करण्याचे एकमेव कारण म्हणजे राजकीय पक्षात असताना वेळोवेळी नगरपरिषद जिल्हापरिषद – पंचायत समिती निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षाकडे उमेदवारी ची मागणी केली . पण पक्षश्रेष्ठीने संधी दिली नाही . विचार न केल्या मुळे यंदाच्या वर्षी स्वःबळावर भोकर विधानसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे .
भोकर विधानसभा मतदार संघात शहरी व ग्रामीण भागात वाढता पांठिबा मिळत आहे . जनतेचा मतदान रूपी आर्शीवाद पाठीशी आहे .अशी प्रतिक्रिया भिमराव दुधारे यांनी माध्यमा समोर व्यक्त केली आहे –