संविधान दिनी पोलीस स्टेशन भोकर येथे 31 रक्तदात्यांनी केले रक्तदान..
भोकर: भोकर येथे आज रोजी पोलीस स्टेशन भोकर येथे मा.श्रीमती आमना मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक,भोकर यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही अजित कुंभार, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भोकर यांनी *26 नोव्हेंबर- संविधान दिन* निमित्त पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कडून “भारताचे संविधान उद्देशिकेचे वाचन”करण्यात आले. तसेच आज रोजी 26/11 चे मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदरांजली म्हणून *पोलीस स्टेशन भोकर व जीवन आधार ब्लड सेंटर नांदेड*यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस स्टेशन भोकर येथे *रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिर मध्ये मा. श्रीमती आमना मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक, भोकर यांनी, आम्ही स्वतः अजित कुंभार पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार, होमगार्ड, पोलीस पाटील, पोलीस मित्र व प्रतिष्ठित नागरिक असे एकूण 31 जणांनी रक्तदान केलेले आहे.