राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे भोकर तालुका अध्यक्ष मोहम्मद मझहरोद्दीन यांना पितृशोक

भोकर ( प्रतिनीधी ) भोकर तालुक्यातील येथील प्रसिध्द “शफी वॉच सेंटरचे” मालक मोहम्मद शोफियोद्दीन यांचे दि. 28 नोव्हेंबर गुरुवार रोजी, अल्पशा आजाराने निधन झाले ते मृत्युसमयी ७३ वर्षाचे होते. त्यांच्यावर हजारोंच्या साक्षीने आम कब्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मोहम्मद शेफियाद्दीन हे अतिशय धीरगंभीर, मनमिळावू,   व हळव्या मनाचे व्यक्तिमत्त्व म्हणून  सर्वदूर परिचित होते.त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दि.28 नोव्हें रोजी सायं 9.00 वाजताच्या सुमारास येथील आम कब्रस्ताना येथे त्यांचा दफनविधी झाला. यावेळी सर्व समाज घटकातील मान्यवर, नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते…

 त्यांच्या पश्चात तीन मुले, पाच मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे भोकर तालुका अध्यक्ष तथा आदिबा गिफ्ट गॅलरीचे सेंटरचे मालक मोहम्मद मझहरोद्दीन यांचे ते वडील होत…

Google Ad