नागापूर ग्रामपंचायतीला मिळाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार : 6 लाख रु.चे बक्षीस

गावाची एकता आणि संघटन शक्तीचे यश
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतून पारितोषिक
भोकर (बी.आर.पांचाळ)

गावातील लोकांचा एकोपा असला की कुठलीही बाब गावासाठी अवघड नाही, त्यासाठी गावाकऱ्यांची संघटन शक्ती देखील लागते, भोकर तालुक्यातील नागापूर हे गाव अशाच  प्रकारे स्वच्छतेसाठी पुढाकार घेणारे असून गावातील सर्व लोकांनी मिळून श्रमदानाने गावाची स्वच्छता केली, गाव सुंदर आणि स्वच्छ बनविले, रस्ते नाल्या, वृक्षारोपण, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचे स्वच्छ पाणी आदि कामे गावातील लोकांनी करून गावाला सुंदर रूप दिले गाव सजविले त्यामुळेच यापूर्वी गावाला 50 लाख रु.चे स्मार्ट व्हिलेज स्पर्धेचे जिल्ह्यातून प्रथम बक्षीस मिळाले आणि नुकताच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा हा पुरस्कार मिळाला आणि गावाला6  लाख रु.चे बक्षीस घोषित झाल्याने गावाने केलेल्या श्रमदानाचे फलित झाले संघटन शक्ती एकतेला यश मिळाले.
                राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावाच्या स्वच्छतेला महत्त्व देऊन आदर्श ग्राम कसे असावे यासाठी ग्रामगीता लिहिली संत गाडगेबाबांनी आपल्या हातात झाडू घेऊन अनेक गावे स्वच्छ केली हाच महामंत्र घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची चळवळ सुरू करण्यात आली या स्पर्धेमध्ये भोकर तालुक्यातील नागापूर गावाने सक्रिय सहभाग घेतला गावातील महिला पुरुष युवक शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपल्या गावासाठी मोठे योगदान देऊन दररोजगावासाठी श्रमदान केले त्यातून स्वच्छ रस्ते करण्यात आले बंदिस्त नाल्या करण्यात आल्या घनकचरा व्यवस्थापन करण्यात आले गावामध्ये कुठलीही घाण दिसत नाही वृक्षारोपण गावात करण्यात आले गावातील ग्रामपंचायतीची सजावट शाळेची सजावट अंगणवाडीची सजावट प्राथमिक आरोग्य केंद्राची सजावट अतिशय सुंदर प्रकारे करण्यात आले दररोज गावातील मंडळी श्रमदानासाठी तासंतास झटत होते गावच्या सर्व लोकांनी एकच ध्यास घेतलेला होता गाव स्वच्छ आणि सुंदर करायचं स्मार्ट व्हिलेज स्पर्धेमध्ये गावाने सहभाग घेतला आणि गावाचे रूपच बदलून गेले सर्व परिसर सुंदर  आणि स्वच्छ झाला गावात झालेल्या वृक्षारोपणामुळे सगळीकडे हिरवळ झाली पिण्याचे स्वच्छ पाणी गावाला मिळाले गावातच घंटागाडी असल्यामुळे कचरा कुठे दिसत नाही शाळा अंगणवाडीची सजावट झाली घरांची सजावट झाली घरांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ झाला बंदिस्त नाल्या झाल्यामुळे घाण पाणी गावात कुठेच नाही प्रत्येक घरामध्ये शौचालयाचा वापर केला जातो पिण्याचे स्वच्छ पाणी गावाला मिळते या सर्व कामासाठी गावाची संघटन शक्ती कामाला आली सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गावासाठी काम केले महिला आणि युवकांचा सुद्धा मोठा पुढाकार होता

* संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार

* *******”*********””””*******

* स्मार्ट व्हिलेज स्पर्धेमध्ये गावाने सहभाग घेऊन 50 लाख रुपयाचे जिल्ह्यातून प्रथम बक्षीस मिळविले त्यानंतर देखील गावाने गावाची स्वच्छता अशीच कायम ठेवून गाव नेहमीसाठी स्वच्छ दिसेल यासाठी सर्व गाव प्रयत्नशील राहिले, गावातील एकोपा, संघटन शक्ती, युवकांची शक्ती, महिला जनजागृती या मुळे गाव सुंदर बनले, सर्वांनी एकच ध्यास धरून गावासाठी मोलाचे प्रयत्न केले,  गावांमध्ये गार्डन ओपन जिम, प्रत्येक शासकीय कार्यालयात सोलार ची व्यवस्था, गावामध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी अशी सर्व व्यवस्था करण्यात आली असून लोक सहभागातून पानंद रस्ते देखील केले आहेत गावामध्ये धार्मिक वातावरण असून आजही सर्व गावाचा एकोपा दिसून येतो त्यामुळेच गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्थ स्पर्धेचे 6 लाख रुपयाचे बक्षीस घोषित झाले जिल्हाधिकारी अविनाश राऊत, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, तहसीलदार सुरेश घोळवे उपमुख्य कार्यकारी अमित राठोड गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांच्या मार्गदर्शनानुसार सरपंच दत्ता व्यवहारे उपसरपंच बालाजी शानमवाड ग्राम विकास अधिकारी नरेंद्र काळे यांनी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावासाठी स्वच्छतेची मोहिम राबविली त्यामुळेच गावाच्या कर्तत्वाचा ठसा शासन दरबारी उमटला आहे

Google Ad