पुण्यातील आयुर्विमा महामंडळ कार्यालयासमोर पुणे विभागातील विमा प्रतिनिधींचे 17 डिसेंबरला सत्याग्रह आंदोलन होणार- प्रमोदकुमार छाजेड..


नगर- भारतीय आयुर्विमा महामंडळाने जुन्या सर्व योजना बंद केल्या असून मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेल्या नवीन योजनांमध्ये अनेक किचकट तरतुदी, काही संभाव्य तरतुदी, त्रुटींमुळे विमाप्रतिनिधींना अडचणीचे ठरत आहे. नवीन तरतुदींमुळे योजना ग्राहकांना फायदेशीर आहे ही चांगलीच गोष्ट आहे पण विमा प्रतिनिधींना मात्र त्या तरतुदी घातक आहेत याबाबत पुणे येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाला देखील निवेदन देऊन घातक असलेल्या परिपत्रकाचा विरोध संपूर्ण देशभर विमा प्रतिनिधी करीत आहेत त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक17 डिसेंबर रोजी पुणे येथे विभागीय कार्यालया समोर सत्याग्रह आंदोलन नगरचे विमा प्रतिनिधी करणार आहे.अशी माहिती ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंटस् फेडरेशन ऑफ इंडिया पुणे विभागाचे विभागीय संघटक सचिव प्रमोदकुमार छाजेड यांनी दिली. याबाबत श्री छाजेड यांनी तसे निवेदन नुकतेच पुणे विभागीय कार्यालयाला दिले असून त्यामध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की
विमा प्रतिनिधी यांनी पॉलिसी विक्री केल्यानंतर जर ग्राहकाना काही अडचणीमुळे पुढील वर्षाचे हप्ते न भरल्यास व पॉलिसी सरेंडर केल्यास विमा प्रतिनिधीला दिलेले कमिशन पुन्हा वसुल करण्याची घातक तरतूद करण्याचा छुपा अजेंडा घेवून आयुर्विमा महामंडळ काम करत आहे, अशी आमची भावना झाली असून तसा स्पष्ट उल्लेख या परिपत्रकात जरी नसला तरी पड‌द्यामागून या हालचाली चालू असल्याच्या दिसून येत आहेत.
आयुर्विमा महामंडळाच्या आजपर्यंत झालेल्या लौकिकामध्ये सर्वात मोठे योगदान माझ्या सारख्या असंख्य विमाप्रतिनिधी बंधु भगिनींनी दिलेले आहे. याचा मला सार्थ अभिमान असून नव्याने चालु असलेल्या हालचाली पाहता आपल्या योजना ग्राहकांसाठी आकर्षक अशा चांगला बोनस देणा-या आयुर्विमा महामंडळाने विक्री साठी काढाव्यात व विमा प्रतिनिधींना एक आर्थिक स्थैर्य पुर्वीप्रमाणे प्राप्त होण्यासाठी कमिशन दरामध्ये बदल न करता, तसेच दिलेले कमिशन वसुलीबाबत असे कुठलेही विमा प्रतिनिधीसाठी घातक असलेले निर्णय घेण्यात येवू नये तसे स्पष्टपणे लेखी पत्रासह आश्वासन मिळावे. हि मागणी मी विमा प्रतिनिधींच्या वतीने आपणाकडे करत आहे. असे निवेदनात नमूद करुन पुणे विभाग 1 मधील विमा प्रतिनिधी काही प्रातिनिधीक स्वरुपात आपल्या कार्यालयसमोर दिनांक 17/12/2024 रोजी उपस्थित राहून सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सविनय सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. असा इशारा दिला.तरी कृपया याची नोंद घेवून आमच्या विमा प्रतिनिधींच्या भावना सन्माननीय चेअरमन वरिष्ठांना आपल्या मार्फत कळविण्यात याव्यात की जेणेकरुन सत्याग्रह करण्याची वेळ येणार नाही. आम्हाला न्याय मिळेल. अशी अपेक्षा प्रमोदकुमार छाजेड यांनी व्यक्त केली आहे. प्रसिध्दी करीता –

Google Ad