शासन मान्यता नसुन सुध्दा…भोकर तालुक्यातील किनी या गावी देशी दारूचे दुकान सुरू…
भोकर तालुक्यात किनी या गावी भोकर स्थानिक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील किनी या गावांमध्ये शासन मान्यताप्राप्त नसुन दारू बंदी अधिकारी यांना हप्ते देऊन देशी दारूची दुकान सुरू आहे.या किनी गावात सकाळ पासून मधपान सुरू होते.या दुकान वर वेळेचे बंधन नाही.अवैध देशी दारूची तस्करी करून सर्रास विक्री सुरू आहे. भोकर तालुक्यातील किनी या गावाकडून दुचाकी तसेच चारचाकीने अवैध देशी दारूची तस्करी पाळज,महागाव,भुरभूसी,निवगा, काडली,आमठाणा, सावरगाव,या गावांमध्ये किनी मधुन अवैध देशी दारूची तस्करी होताना दिसत आहे.सद्यस्थितीत आदी गावांमध्ये दारूची अवैध विक्री केली जात आहे.देशी दारू विनासायास उपलब्ध होत असल्याने अनेक जण त्याच्या आहारी जात असून, परिसरातील सामाजिक आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अवैध देशी दारू विक्री व तस्करी जोमात सुरू असली तरी राज्य उत्पादन शुल्क विभागासह भोकर दारू बंदी अधिकारी चे दुर्लक्ष होत दिसत आहे.असल्याची ओरड आहे.असताना, दारूच्या पेट्या घेऊन जाणारी वाहने येथील पोलिसांना दिसत नाहीत का, असा मोठा प्रश्न येथे नागरिकान मध्ये निर्माण झाला आहे.