भोकर मध्ये इनामी जमिनीचे खोटे फेरफार, खरेदी खत तयार करून जमिन हडप करण्याचा प्रयत्न

भोकर( तालुका प्रतिनिधी) शहरातील इनामी जमिनीचे खोटे फेरफार सातबारा होल्डिंग खरेदी खत करून जमीन हडप करणाऱ्या व बेकायदेशीरपणे जमीन नावे करून घेणाऱ्या इसमाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी अशी तक्रार मोहम्मद इलियास अब्दुल वहिद यांनी तहसीलदार यांच्याकडे केली असून योग्य न्याय न मिळाल्यास 30 डिसेंबर पासून कुटुंबीयांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
तहसीलदार भोकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भोकर येथील गट क्रमांक 399 मध्ये इनामी जमीन आहे त्या जमिनीचे खोटे फेरफार, सातबारा, होल्डिंग, खरेदीखत तयार करून सर्वे नंबर 170, 171 क्षेत्रफळ 86 आर एवढी जमीन असून माझ्या कुटुंबीयांची कोणतीही सहमती नसताना खोटे कागदपत्र तयार करून सय्यद अहमद सय्यद कासिम यांनी जमीन नावे करून घेतली 1988 पासून मी त्या जमिनीचा ताबेदार आहे याप्रकरणी शासनाकडे अनेक वेळा निवेदने तक्रारी करण्यात आल्या आहेत मात्र तकियादारी इनामी जमिनीची कोणतीही पडताळणी चौकशी करण्यात आलेली नाही खरेदीखत सातबारा होल्डिंग खोटे तयार करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी बेकायदेशीरपणे जमीन नावे करून घेतलेले कागदपत्र रद्द करण्यात यावे 30 डिसेंबर 2024 रोजी पासून तहसील कार्यालयासमोर कुठून बिया सह अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनात मोहम्मद इलीयसअब्दुल वहिद यांनी दिला असून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, जिल्हा वक्तफ बोर्ड यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत..
भोकर मध्ये इनामी जमिनीचा मोठा घोळ..?

भोकर शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर इनामी जमीन असून सदरील जमिनीची नियमबाह्य अनाधिकृत रित्या विक्री करण्याचा प्रकार गेली अनेक दिवसापासून चालू आहे, नगरपरिषद कार्यालयात गुंठेवारी, फेरफार, लेआउट अनाधिकृत रीत्या लावण्यात आले, तलाठी कार्यालयात सुद्धा खोट्या प्रकारच्या नोंदी झाल्या, दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्रीचे व्यवहार पण झाले मागील काही वर्षांपूर्वी भोकर मध्ये इनामी जमिनीचा घोटाळा मोठ्या प्रमाणात करण्यात आला असून सत्यता पडताळून बघितल्यास जमिनीचा खोटा कारभार उघडकीस येऊ शकतो संबंधित सर्व कार्यालय या खोट्या कारभारासाठी जबाबदार धरले जाऊ शकतात, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भोकर मधील इनामी जमिनीच्या घोटाळ्याची कसून चौकशी करावी अशी मागणी होत आहे.