वंदे भारत ट्रेन चा विस्तार नांदेड पर्यंत होणार : खा.डॉ.अजित गोपछडे.

वंदे भारत ट्रेन चा विस्तार नांदेड पर्यंत होणार : खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या प्रश्नावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे संबंधित विभागाला सर्वे करण्याचे निर्देश
नांदेड : नांंदेड-हैदराबाद, नांदेड-नागपुर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरु करावी तसेच मुंबई-जालना वंदे भारत रेल्वे नांंदेड पर्यंत विस्तारित व्हावी. शिवाय नांदेड रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छता या साठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत अतारांकित प्रश्न मांडले. या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत नांदेड पर्यंत विस्तारित करण्याचे अनुषंगाने संबंधित विभागाने तातडीने अहवाल सादर करावा अशी आदेश दिले आहेत त्यामुळे जालना पर्यंत येणारी वंदे भारत नांदेड पर्यंत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई – जालना असलेली वंदे भारत रेल्वे नांदेड पर्यंत सोडावी यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे यापूर्वीच पाठपुरावा केला होता. शिवाय राज्यसभेतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला . खा.डॉ. अजित गोपछडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी सकारात्मक उत्तर देत वंदे भारत जालन्याहून नांदेड पर्यंत विस्तार करण्याचे अनुषंगाने सर्वे करण्यासाठी आपण संबंधित विभागाला आदेश दिल्याचे लेखी पत्र केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. डॉ. अजित गोपछडे यांना पाठवले आहे. शिवाय या अनुषंगाने राज्यसभेत बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की ,वंदे भारत ट्रेन सेवा समावेश व विस्तारासह गाड्यांच्या नवीन सेवांचा समावेश करणे हा रेल्वे मंत्रालयाचा चालू प्रक्रियेचा भाग आहे, जो प्रवासी मागणी, कार्यरत व्यवहार्यता, उपलब्ध संसाधने इत्यादींवर अवलंबून आहे. नांंदेड रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छतेच्या प्रश्ना संदर्भात रेल्वे मंत्रालयाने कळविले की, स्वच्छता हा सतत चालणारा प्रक्रियात्मक भाग आहे आणि भारतीय रेल्वे सर्व रेल्वे स्थानकांना व्यवस्थित देखभाल आणि स्वच्छ स्थितीत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करते. नांदेड स्थानक आणि परिसराची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी, रेल्वे प्रशासनाने स्थानकाच्या जवळच्या रस्त्याच्या बांधकामाची समस्या सोडवण्याचे तसेच स्थानकाबाहेर असलेल्या दुकानदारांकडून रेल्वे हद्दीत कचरा टाकण्यास प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली आहे.असल्याचेही ते म्हणाले.

Google Ad