हाडोळीच्या ग्रामस्थांनी 1 एकर 10 गुंठे जागेवरील अतिक्रमण हटवून गाव केले” स्वच्छ” आणि सुंदर

तालुक्यातील हाडोळी गावाने नेहमीच ग्राम स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला असून आपले गाव स्वच्छ राहावे यासाठी सामूहिक प्रयत्न केला, अनेक पुरस्कारांनी गावाचा सन्मान झाला आहे स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या गावातील महत्वाच्या जागेवर अतिक्रमण करून उकिर्डे टाकण्यात आले होते ते हटवून जागा स्वच्छ करावी असा विचार काही लोकांच्या मनामध्ये आला मात्र त्यासाठी विरोध हीसुरू झाला होता, गावाच्या स्वच्छतेसाठी व रोगराई दूर व्हावी यासाठी अखेर संपूर्ण गावकऱ्यांनी निर्णय घेऊन 1 एकर 10 कुंटे जागेवरील अतिक्रमण काढून उकिरडे, कचरा, वाढलेली झाडे, स्वच्छ करून जागा मोकळी केल्याने गावाच्या सुंदरतेमध्ये भर पडली आहे.
भोकर तालुक्यातील हाडोळी गावाने ग्रामस्वच्छता अभियानात प्रारंभी पासूनच पुढाकार घेतला असून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला होता, त्यानंतर पाणी फाउंडेशन स्पर्धेत सहभाग घेऊन गावाने बक्षीस मिळविले, स्मार्ट व्हिलेज स्पर्धेमध्ये देखील गाव सुंदर बनवून गावाला प्रथम बक्षीस मिळाले या सर्व कामांमध्ये गावातील सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन गावाच्या स्वच्छतेचा निर्णय घेतला,संघटितपणे श्रमदान करून रस्ते स्वच्छ केले, नाल्या स्वच्छ केल्या, महिला युवक पुरुष विद्यार्थी या सर्वांनी सहभाग घेऊन संघटितपणे गावाच्या स्वच्छतेचा ध्यास घेतला होता, आजही गाव स्वच्छतेसाठी नेहमीचा अग्रेसर आहे गावातील एकोपा आणि संघटन टिकून आहे

  • 1 एकर 10 गुंठे जागेवरील अतिक्रमण हटविले..
    11 नोव्हेंबर 2021 ला गावाने स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत सहभाग घेऊन तालुक्यातून प्रथम जिल्ह्यातून प्रथम व विभागातून प्रथम क्रमांक मिळवला, त्यानंतर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील राज्यस्तरीय पुरस्कार गावाला मिळाला, याच गावातील 80 लोकांनी महत्त्वाच्या जागेवर अतिक्रमण केले होते त्या जागेवर उकिरडे टाकण्यात आले होते, पावसाळ्यात घाण पाणी साचून दुर्गंधी पसरत होती, झाडे झुडपे वाढलेली होती, केरकचरा तिथे साचला होता. विविध पुरस्काराने सन्मानित झालेल्या गावासाठी ही बाब चांगली दिसत नव्हती म्हणून ग्रामपंचायतीने व गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी सदरील अतिक्रमण काढण्यात यावे असा निर्णय घेतला या निर्णयाला प्रारंभी मोठ्या प्रमाणात विरोध झाला काही दिवस गावात चर्चा चालू लागली ग्रामपंचायतीने गावात दवंडी देऊन सदरील जागेवरील अतिक्रमण दहा दिवसात काढून घेण्यात यावे असे आवाहन केले सर्व गावकऱ्यांनी या निर्णयाला अखेर संमती दिली आणि गावाच्या स्वच्छतेचा मार्ग निघाला, संपूर्ण परिसर जेसीबीने साफ करण्यात आला झाडे झुडपे घाण कचरा काढून टाकण्यात आला आणि गावातील 1 एकर 10 गुंठे जागेवरील अतिक्रमण मुक्त झाले पुन्हा गावाच्या वैभवा मध्ये भर पडली. असेच चांगले निर्णय गावाच्या विकासासाठी इतर गावकऱ्यांनी घेतली तर प्रत्येक गाव सुंदर बनू शकते
Google Ad